पाटोदा येथे वादळाने द्राक्षबाग उद्ध्वस्त


येवला -पाटोदा येथे सोसाट्याच्या वादळाने दोन एकर द्राक्षबाग कोसळून उद्ध्वस्त झाल्याने सुमारे १५ लाखांचे नुकसान झाले आहे. पाटोदा गावालगत रोडवर ज्ञानेश्‍वर सुकदेव बोरणारे यांची चार एकर द्राक्षबाग असून, दोन एकरात द्राक्षबाग खुडणीचे काम सुरू आहे. आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास आकस्मित आलेल्या सोसाट्याच्या वादळाने दोन एकर द्राक्षबाग कोसळून उद्ध्वस्त झाल्याने बोरणारे यांचे सुमारे १५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तलाठी पी.डी. पवार यांनी घटनेचा पंचनामा केला आहे. दरम्यान, घटनास्थळी बाळासाहेब लोखंडे, तालुका कृषी अधिकारी अशोक कुळधर, बाळासाहेब पिंपरकर, पुंडलीक पाचपुते, रतन बोरणारे आदिंनी भेटी दिल्या. नुकसानग्रस्त शेतकर्‍यास तत्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.
थोडे नवीन जरा जुने