गुरुदेव इंग्लिश स्कूलचे ऑलिम्पियाडमध्ये यश

विश्‍वात्मक गुरुदेव गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, पुरणगाव (ता. येवला) येथील विद्यालयाने नुकत्याच झालेल्या नॉलेज हॉवर्स इंटरनॅशनल जी. के. ऑलिम्पियाड परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. जी.के. ऑलिम्पियाड परीक्षेचा निकाल विद्यालयाला प्राप्त झाला. त्यामध्ये विद्यालयातील एकूण सहा विद्यार्थी सुवर्णपदकाचे मानकरी ठरले (कंसामध्ये नॅशनल रँक) त्यात जगताप प्रतीक्षा रवींद्र (३३), वाघ प्रणाली बापूसाहेब (३४), चेचरे प्रतीक पांडुरंग (३५), जगताप प्रतीक नितीन (३६), कुंदे सुमित दत्तात्रय(३७), राठोड ऋषिकेश शरद (३८) आदींनी नॅशनल रँकमध्ये आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले. यशस्वी विद्यार्थ्यांना गायत्री वाघ, कल्पना निकम, रश्मी तायडे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष हनुमंतराव भोंगळे, मुख्याध्यापिका विद्या सांगळे, शिक्षक वृंद, फोफसे (व्यवस्थापक), प्रकाश वाघ (पं.स. सदस्य येवला) व परिसरातील पालक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
थोडे नवीन जरा जुने