संत नागेबाबा मल्टिस्टेटच्या पतसंस्था व अजब प्रकाशन, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य पुस्तक प्रदर्शन




येवल्यात संत नागेबाबा मल्टिस्टेटच्या पतसंस्था व अजब प्रकाशन, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य पुस्तक प्रदर्शन 

येवला : प्रतिनिधी
शहरातील संत नागेबाबा मल्टिस्टेटच्या पतसंस्था व अजब प्रकाशन, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने येवला शहरात भव्य पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले. संस्थेचे संस्थापक चेअरमन कडूभाऊ काळे यांचा ध्यास आहे कि नव्या पिढीला वाचन संस्कृती समजावी, ग्रामीण भागात नवीन उद्योजक घडावे. यासाठी ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात एकूण 20 ठिकाणी प्रदर्शन भरवण्यात आले आहे.  येवला शहरातील गणेश मंगल कार्यालय बुरुड गल्ली या ठिकाणी 21 वे पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन व्यंगचित्रकार प्रभाकर झळके, एन्झोकेम हायस्कुलचे प्राचार्य दत्ता महाले, तलाठी मनीषा इंगवे, प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी शेख अजीज, संतोष पुंड ,प्रवीण पाटील, संस्थेचे रिजनल ऑफिसर  अक्षय काळे, येवला शाखेचे शाखाधिकारी नाईक, सातपुते, व्यवहारे ,सोनवणे, कॅशियर कु. मुंगीकर आदी उपस्थित होते.
================================
फोटो कॅप्शन - पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन करताना व्यंगचित्रकार प्रभाकर झळके, समवेत दत्ता महाले, प्रसाद कुलकर्णी, आदि 

 
 

 

थोडे नवीन जरा जुने