रेंडाळे ग्रामपंचायतीला ठोकले ग्रामस्थांनी कुलूप

येवला- रेंडाळे (ता. येवला) येथील अकार्यक्षम ग्रामसेवक बागूल यांची तातडीने बदली करून नव्याने ग्रामसेवकाची नियुक्ती करण्यात यावी, या मागणीचे निवेदन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजय जोशी यांना देऊन याबाबत दखल न घेतल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला आज सकाळी कुलूप ठोकले.

कुठल्याही योजनांचा प्रस्ताव हा पंचायत समितीकडे पाठविला जात नाही. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळे वाड्या-वस्त्यांवर पिण्याचा पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. टँकर सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव अद्यापही तयार करण्यात आला नाही, तसेच ग्रा.पं. दप्तरी अनेक त्रुटी आढळल्या आहेत. त्यामुळे ग्रामसेवकाची बदली करून नवीन ग्रामसेवक द्यावा, या मागणीचे निवेदन सरपंच दत्तू देवरे व ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी जोशी यांना दिले. याबाबत दखल न घेतल्याने ग्रामस्थांनी आज ग्रा.पं.ला कुलूप ठोकले. दिवसभरात कोणताही अधिकारी याठिकाणी फिरकला नाही. याप्रसंगी सरपंच दत्तू देवरे, सदस्य भागीनाथ गरुड, भाऊ साहेब, गरुड, चांगदेव थोरात, प्रभाकर गरूड, अनिल मुलतानी, o्रावण देवरे, संपत देवरे, भरत देवरे, तुकाराम मोरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने