द्राक्ष उत्पादकांना फसविणार्‍यांची साखळी उघड

येवला - तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांना लाखो रुपयांचा चुना लावणार्‍या द्राक्ष व्यापार्‍यांची आता साखळीच उघड होऊ लागली आहे. सुरत येथील द्राक्ष व्यापार्‍याला काल मंगळवारी तालुका पोलिसांनी अटक केली. दरम्यान चांदवड तालुक्यातील खेलदरीच्या पंडित जाधव या द्राक्ष व्यापार्‍याला न्यायालयाने आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.
चांदवड तालुक्यातील खेलदरी येथील पंडित जाधव या द्राक्ष व्यापार्‍याने साडेबारा लाखांचा गंडा घातल्याची फिर्याद पाच द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांनी तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर जाधवला अटक करण्यात आली होती. प्रथम चार व त्यानंतर पुन्हा चार दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने जाधव यास सुनावल्यानंतर बुधवारी जाधवची पोलीस कोठडीची मुदत संपली होती. जाधवला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
सुरतच्या द्राक्ष व्यापार्‍यालाही अटक
या घटनेत तालुका पोलिसांनी गुजरात राज्यातील सुरतमधील सरदार मार्केटचा रहिवासी असलेला द्राक्ष व्यापारी कपिलकुमार चावला याला सुरत येथून ताब्यात घेत अटक केली आहे. तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांकडून द्राक्षमाल चांदवड येथील पंडित जाधव हा द्राक्ष व्यापारी ज्यावेळी विकत घेत होता तेव्हा सुरतचा द्राक्ष व्यापारी कपिलकुमार चावला हा माल जाधव याच्याकडून घेत होता व द्राक्षमाल वाहून नेण्यासाठी वाहने व कॅरेट आदी साहित्य कपिलकुमार चावला याचेच होते हे पोलीस तपासात उघड झाले आहे.
थोडे नवीन जरा जुने