येवल्यात महामानवाला अभिवादन शहरासह तालुक्यातील विविध संस्था, संघटना, राजकीय पक्षांनी केली जयंती साजरी

येवला - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२२वी जयंती शहर व परिसरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महामानवाला विविध संस्था, संघटना, राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.
नानासाहेब शिंदे बहुउद्देशीय संस्थेत नगरसेविका पद्मावती शिंदे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. त्यावेळी सुनिल शिंदे, एकनाथ गायकवाड, नानासाहेब शिंदे व इतर उपस्थित होते.
विंचूर चौफुलीवर अभिवादन
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला आकर्षक रोषणाई करण्यात आली असून पालिकेच्या वतीने नगराध्यक्ष नीलेश पटेल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी तहसीलदार हरीश सोनार, मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर, उपनगराध्यक्षा भारती जगताप, पोलीस निरीक्षक श्रावण सोनवणे, पालिका गटनेते प्रदीप सोनवणे, दीपक लोणारी, भूषण शिनकर, भूषण लाघवे आदी उपस्थित होते.
नगर परिषद कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला नगराध्यक्ष नीलेश पटेल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपनगराध्यक्षा भारती जगताप, मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर, तहसीलदार हरीश सोनार, नगरसेविका पद्मा शिंदे, राजश्री पहिलवान उपस्थित होत्या.
मुक्तिभूमीवर पूजन
मुक्तीभूमीवर डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेचे रिपाइंचे शहराध्यक्ष गुड्डू जावळे, नगराध्यक्ष नीलेश पटेल, बी. आर. लोंढे, अविनाश कुक्कर, वसंत पवार, सभापती राधिका कळमकर, सदस्य प्रकाश वाघ आदींच्या हस्ते पूजन करण्यात आले. आंबेडकर नगरात नगराध्यक्ष नीलेश पटेल यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपनगराध्यक्षा भारती जगताप होत्या. जयंती कार्यक्रमास नगरसेविका उषाताई शिंदे, दीपक लोणारी, सुभाष गांगुर्डे, बालमुकुंद जगताप, विलास पगारे, कुणाल दराडे, बी. आर. लोंढे, बापू पगार, प्रवीण पहिलवान, आनंद शिंदे, दौलत गाडे, डॉ. चंद्रशेखर क्षत्रिय, भगवान साबळे आदी उपस्थित होते.
महाविद्यालयात व्याख्यान
शहरातील महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला आणि वाणिज्य महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर डॉ. जे. वाय. इंगळे यांचे व्याख्यान झाले. दलित समाजाला आत्मभान मिळवून देण्याचे व सामाजिक एकरूपता घडवून आणण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केल्याचे इंगळे यांनी सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरीश आडके हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रतिमा पूजन प्राचार्य हरीश आडके यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे यांनी केले. यावेळी प्रा. एस. डी. गायकवाड, डॉ. पी. टी. वानखेडे, प्रा. शिरीष नांदुर्डीकर, प्रा. डॉ. राजेंद्र भोसले, प्रा. डी. सी. जाधव, प्रा. रमेश पहिलवान आदींनी प्रतिमा पूजन केले.
विद्यार्थ्यांचे सलग १६ तास वाचन
येवला -
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून शहरातील आंबेडकर वसतिगृहात हिरामण मेश्राम, प्रवीण अढांगळे, नितीन संसारे, हितेश पगारे, कैलास बनसोडे यांनी इंजिनीअरिंग, फॉर्मसी अशा विविध शाखांमधील १२ विद्यार्थ्यांना एकत्रित आणून सलग १६ तास वाचनाचा कार्यक्रम घडवून आणला. या कार्यक्रमास बापू पगारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

थोडे नवीन जरा जुने