येवला औद्योगिक वसाहतीच्या प्रशासकाला हटवा ---- अशोक संकलेचा

येवला - येवला सहकारी औद्योगिक वसाहत चे बेकायदेशिर प्रशासक तात्काळ
हटवण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीचे अशोक संकलेचा यांनी २ दिवस उपोषण
केले. येवला सहकारी औद्योगिक वसाहत या संस्थेचे कामकाज कायदेशीरपणे होत
नसल्याने संचालक मंडळ बरखास्त करून संस्थेवर प्रशासकीय मंडळाची नियुक्ती
२ वर्षापूर्वीच झालेली आहे. प्रशासकाकडून घेतले गेलेले अनेक निर्णय हे
बेकायदेशीर असल्याचा दावा त्यांनी केला आहे. वेळोवेळी प्रशासकाला दिली
गेलेली मुदतवाढ ही संशयास्पद असून प्रशासन काळात प्लॉट जप्ती आणि वाटपाचे
प्रकार यात मोठा गैरव्यवहार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वास्ताविक
प्रशासकीय काळ हा सहा महिन्याचा असताना या संस्थेची निवडणुक घेणे टाळले
गेले यामध्ये काहीचे हित जपले गेले असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
शासनाने तातडीने नवा प्रशासक नेमुन निवडणुक घेणेची मागणीसाठी त्यांनी
वेळोवेळी मागणी केली .
येवला तालुक्यातील अंगणगाव येथे असलेल्या या वसाहतीमध्ये सुविधाची वानवा
आहे. त्यातून मार्ग काढीत काही उद्योग उभे राहत असून काहींनी फक्त प्लॉट
अटकवून ठेवलेले आहे. ही संस्था ताब्यात घेणेसाठी अनेकजण प्रयत्नशील
असल्याचे समजते. तालुक्यात वाढलेले जमिनीचे भाव सध्या येथे चालू असलेले
विकासकामे यामुळे प्रशासकाकडून वाटले गेलेले व दहशतीने जप्त झालेले प्लॉट
या व्वयहाराबाबत तालुक्यात चर्चेला उधाण आलेले आहे.
सोमवारी अशोक संकलेचा यांनी येवला तहसिल कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात
केली मंगळवारी येवला तहसिलदारांनी दिलेल्या आश्वासनानंतर हे उपोषण
थांबविण्यात आले. येवला औद्योगिक सहकारी वसाहतीचा प्रशासकीय कालावधीतील
व्यवहाराबाबत तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरु असून याबाबत पालकमंत्री काय
निर्णय घेतात याकडे जनतेचे लक्ष लागलेले आहे.
थोडे नवीन जरा जुने