येवला शहरात चोरट्यांचा सुळसुळाट..............भर दिवसा चोरी


येवला - शहरात चोरट्याचा फार सुळसुळाट झालेला असून त्यामुळे नागरिंकामध्ये चिंतेचे वातावरण पसरलेले आहे. येवला ग्रामिण रुग्णालयात कार्यरत असलेले डॉ.श्रीकांत भडांगे यांच्या ग्रामिण रुग्णालयातील सरकारी निवासस्थानात  भरदिवसा घरफोडी झाली आहे. डॉ.भंडागे हे मिटींगसाठी बाहेरगावी गेलेले होते. त्यांची पत्नी डॉ.पूनम भडांगे या बाजारात खरेदीसाठी गेल्या असताना सकाळी ११ ते १२ च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कुलुप तोडून घरातील सुटकेसमधील दागीने व रोख रक्कम १५ हजार रुपये लंपास केले. सुमारे ५ तोळे दागीने चोरीला गेले असून भरदिवसा झालेल्या या चोरीमुळे पोलिसांची कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे.
दरम्यान श्वानपथक चोरट्यांचा माग काढू शकले नाही. ठसेतज्ञांनी ठसे नेले असून तपास चालू आहे.
या आधी झालेल्या कोणत्याही चोरीचा तपास लागला का असा प्रश्न जनता विचारत आहे. याबाबत शहर पोलिसांमध्ये अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.
थोडे नवीन जरा जुने