येवल्यातील लाचखोर पोलिसांना कोठडी

येवला- वाळू चोरी प्रकरणी व्यावसायिकाला अभय देण्यासाठी ३0 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलेल्या ग्रामीण पोलीस दलातील तिघा कर्मचार्‍यांना आज न्यायालयाने एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक सोमनाथ कर्णवार, हवालदार बापू शिंदे व शिपाई तुषार खालकर अशी कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. वाळू चोरीप्रकरणी दाखल झालेल्या गुन्हय़ात पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी मिळवून देण्यासाठी वाळू व्यावसायिकाकडे ५0 हजारांची लाच संशयितांनी मागितली होती. त्यात तडजोड होऊन ठरलेली तीस हजारांची रक्कम घेताना धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संशयितांना अटक केली होती.
थोडे नवीन जरा जुने