कंचनसुधा एकॅडेमी मध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धा उत्साहात पार

येवला - (अविनाश पाटील) - कंचनसुधा एकॅडेमी या इंग्रजी माध्यमाच्या
शाळेमध्ये पुर्व प्राथमिक विभागाची फॅन्सी ड्रेस स्पर्धा मोठ्या उत्साहात
पार पडली. बाळाचे पाय पाळ्यात दिसतात या उक्तीचा प्रत्य यावेळी आला.
पोलिस, सैनिक,रानी लक्ष्मीबाई, मावळे,नऊवारी,वाघ, शंकर, पोपट
मोर,साध्वी,वारकरी यासारखे अनेक प्रकारच्या वेशभुषा करुन बालमंडळी वावरत
होती. परिक्षक म्हणून सौ.पारूल यती पटेल,सौ.सरोज राजेंद्र भावसार,
सौ.श्रध्दा संजय श्रीश्रीमाळ यांनी काम पाहीले. कार्यक्रमाची प्रस्तावना
निकहत शेख यांनी केली.
तसेच दुपारच्या सत्रामध्येप्रश्नमंजुषेचा कार्यक्रम झाला. या मध्ये १ ली
ते ५ वी च्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला. या कार्यक्रमाचे संयोजन
सौ.जिशामोल जोसेफ व सौ.चित्रा पाटील -वाघ यांनी केले. सुत्रसंचालन
पर्यवेक्षक सॅमसन शिंदे यांनी केले. आभार प्रदर्शन सौ.नयना गोरे यांनी
केले. कार्यक्रमासाठी संस्थेच्या सचिव सौ.रचना अजय जैन, सौ. जयश्री
रविंद्र जैन, समन्वयक अक्षय जैन , प्राचार्य दवंगे सर उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने