साईराज शिक्षण संस्थेने महिलादिनी कष्टकरी महिलांचा केला सन्मान

येवला - (अविनाश पाटील) साईराज शिक्षण संस्थेच्या विश्वलता
महाविद्यालयाने प्रतिकूल परिस्थितीत स्वत:च्या पायावर उभ राहून कुटुंबाचा
आधार बनलेल्या रणरागिणींचा सन्मानपत्र देऊन महिला दिनी गौरव करण्यात आला.
विशेष म्हणजे, कार्यस्थळी जाऊन महिलांचा सन्मान झाला. बसस्थानकाबाहेर
रसवंती चालविणार्‍या सुनीता रमेश सोनवणे, विंचूर चौफुलीवर तीस
वर्षांपासून चहा विकणार्‍या पंचकुला पांगुळ, धोबी व्यवसाय करणार्‍या
परवीन शेख, वडापाव दुकान सांभाळणार्‍या रंजना सुभाष राऊत, फळविक्रेत्या
उषा रमेश वाहुळ, रुग्णसेवा करणार्‍या हिराबाई राजू सातभाई, नारळविक्रीचा
व्यवसाय करणार्‍या ज्योती परदेशी यांसह इतर 40 महिलांचा सन्मान करण्यात
आला. या गौरवाने सन्मानार्थिंना अश्रू अनावर झाले होते. या उपक्रमात
संस्थेच्या विश्वस्त अरुणा लाघवे, प्रा. हेमांगी बाकळे, प्रा. पूनम
दातरंगे, प्रा. रूपाली जेजूरकर, प्रा. प्रियंका शिरोडे, प्रा. अश्विनी
लाघवे, प्रा. मुक्ता मेधणे यांनी सहभाग घेतला.
.
थोडे नवीन जरा जुने