हॉटेल व्यावसायिकांची वाढीव पाणीपट्टी रद्द करण्याची मागणी

हॉटेल व्यावसायिकांची वाढीव पाणीपट्टी रद्द करण्याची मागणी
येवला – वार्ताहर
शहरातील हॉटेल व उपहारगृहावर लादण्यात आलेली १०० टक्के अन्यायकारक वाढीव पाणीपट्टी रद्द करून २० टक्के इतकी योग्य पध्दतीने वाढीव पाणीपट्टी आकारण्याची मागणी हॉटेल व्यावसायिकांनी मुख्याधिकारी राहुल वाघ यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे. वाढीव पाणीपट्टी आकारणीमध्ये  छोटे व मोठे हॉटेल असा भेदभाव केला असून मोठ्या हॉटेलचा पाणीवापर जास्त असूनही त्यांना फक्त १५ टक्के पाणीपट्टी वाढ केल्याचा आरोपही निवदेनात केला आहे.
शहरातील किरकोळ हॉटेल व्यावसायिक पाण्यासाठी व्यावसायिक दराने पिण्याचे नळ कनेक्शन वापरत असून ते नगरपालिकेला घरगुती नळ कनेक्शनच्या दुप्पट पाणीपट्टी भरतात. नगरपालिकेन सध्या २० टक्के पाणीपट्टी वाढ केली आहे. त्यानुसार छोटे हॉटेल व्यावसायिक १६१२ रुपये वार्षिक पाणीपट्टी देत होते. परंतू आत्या नव्या दरानुसार नगरपालिका प्रशासन ३२२४ रुपये पाणीपट्टी आकारित असून ही वाढ अन्यायकारक असल्याचे हॉटेल व्यायसायिकांनी दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे. मोठ्या हॉटेल मध्ये पाण्याचा वापर जास्त होतो त्यांच्या पाणीपट्टीमध्ये मात्र ३५०० रुपयेवरून  फक्त ४००० रुपये इतकीच वाढ केली आहे. या दुजाभावामुळे सामान्य हॉटेलचालकांवर अन्याय होत असून १०० टक्के पाणीपट्टी वाढ आम्हाला मान्य नसून २० टक्के पाणीपट्टी वाढ करावी अशी मागणी निवेदनात केली आहे. मागणी मान्य नझाल्यास सनदशिर मार्गाने दाद मागण्याचा इशाराही निवेदनामध्ये हॉटेल व्यावसायिकांनी दिला आहे. निवेदनावर विसावा हॉटेल, श्रीकृण्ण हिंदू हॉटेल, शुभकामना हॉटेल,राधाकृष्ण हिंदू हॉटेल,जमनाप्रसाद हॉटेल,महेश हॉटेल,पवार उपहार गृह, लकी टी हाऊस,गुप्ता रेस्टॉरंट, गणेश टी हाऊस, बजरंग हॉटेल,एसटी उपहार गृह, मंगल भवन, अपना हॉटेल, सलिम हॉटेल, नागपुरे टी स्टॉल, भाग्यश्री हॉटेल, मित्रविहार हॉटेल, मथुरा हॉटेल आदी हॉटेल व्यावसायिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

थोडे नवीन जरा जुने