येवल्यात पैठणी विणकरांना मोफत संगणक प्रशिक्षण

येवल्यात पैठणी विणकरांना मोफत संगणक प्रशिक्षण

येवला – वार्ताहर
पंतप्रधानांच्या उन्नत भारत अभियानांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ,विभागीय केंद्र पुणे यांचे मार्फत पैठणी विणकरांकारिता येवला येथे मोफत संगणक प्रशिक्षण देण्यात येणार असून प्रशिक्षणा करिता प्रवेश देण्याची प्रक्रिया ३० मार्च २०१७ पासून  स्वामी मुक्तानंद विद्यालय येवले येथे सुरु करण्यात आली आहे. या प्रवेश नोंदणी करिता आधार कार्ड आणि विणकर कार्ड ची झेरॉक्स आणि दोन फोटो आवश्यक आहे.
        भारतातील विणकरांकारिता भारत सरकारच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सहयोगाने हि योजना सुरु करण्यात आली असून विणकर समाजाला MS-OFFICE, इन्टरनेट, वेबतंत्रज्ञान आणि समस्यानिवारण संबधीत मुलभूत माहिती आणि कौशल्य आत्मसात करण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे याकरिता केवळ कार्यात्मक साक्षर असणे आवश्यक आहे.
पैठणी विणकरां करिता मोफत प्रशिक्षण मिळविण्यासाठी पैठणी क्लस्टरचे कार्यकरी संचालक विक्रम गायकवाड यांनी विशेष प्रयत्न केले असून इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे प्रादेशिक संचालक डॉ. मसूद परवीझ आणि उप संचालक डॉ. सौनंद सोमासी यांनी खास येवले येथील पैठणी क्लस्टरला भेट देऊन प्रशिक्षणाचा कार्यक्रम तयार केला आहे. तसेच प्रशिक्षणा बाबतचा करार स्वामी मुक्तानंद विद्यालयाशी केला आहे. या प्रसंगी स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या संस्थेचे अध्यक्ष शरद नागडेकर , दीपक गायकवाड ,प्रा. चंद्रभान दुकळे , एस. बी. निकम, मर्चंट बँकेचे संचालक आणि वस्रोद्योग संघाचे जिल्हाध्यक्ष मनोज दिवटे हे उपस्थित होते.
 या संगणक प्रशिक्षणासाठी स्वामी मुक्तानंद विद्यालयाचे संगणक शिक्षक बी.के.जाधव. फोन.९८५००९२८०६ आणि एन. के. बाविस्कर,९९७०७३६८६५ संपर्क साधावा असे आवाहन पैठणी क्लस्टरचे कार्यकरी संचालक विक्रम गायकवाड यांनी केले आहे.

थोडे नवीन जरा जुने