कालिका प्राथमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

कालिका प्राथमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे


येवला : वार्ताहर 
येथील कालिका प्राथमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमात विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा  आयोजित करण्यात आल्या होत्या. तसेच या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. बहारदार नृत्यांनी आपल्या पालकांची व मान्यवरांची मने जिंकली. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय शूळ, उद्योगपती सुशील गुजराथी, व्यंगचित्रकार प्रभाकर झळके, अतुल पोफळे, बबन सुरासे, संजय परदेशी, सोहन आहेर, उमेश कंदलकर, सुरेश कासार,माजी नगरसेवक संजय कासार, मनोज कायस्थ, आदि उपस्थित होते. दिपप्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. मुलांनी एकापेक्षा एक सरस नृत्य सादर केली. कोळीगीते, शेतकरी गिते, भक्तीगीते तसेच गौवळणी सादर करत महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रंजना आहेर व शोभा आहेर यांनी केले. शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री ठाकूर यांनी प्रमुख पाहुण्याचे स्वागत व सत्कार केले. तसेच शाळेच्या वार्षिक प्रगतीचा आढावा घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महेश आहेर, राहुल खंडीझोड, नंदन बोरसे, आशुतोष सोनवणे, विठ्ठल शिंदे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
==============================================
फोटो कॅप्शन - कालिका प्राथमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात कलागुण सादर करताना विद्यार्थी 
===============================================

थोडे नवीन जरा जुने