एसएनडी अभियांत्रिकी महाविद्यालयात विध्यार्थीहितासाठी फॉरेन लॅग्वेज सेंटर स्थापणार

 


एसएनडी अभियांत्रिकी महाविद्यालयात विध्यार्थीहितासाठी फॉरेन लॅग्वेज सेंटर स्थापणार


 

येवला : वार्ताहर

येथील जबदंबा शिक्षण संस्थेच्या एस.एन.डी अभियांत्रिकी महाविद्यालयात फॉरेन लॅग्वेज सेंटरची स्थापना करण्यात येणार आहे. या निर्णयाला विद्यार्थ्याचा प्रतिसाद मिळत असून जागतिक संवादाकरिता, उच्चशिक्षण, नोकरी अथवा व्यवसाय यामध्ये नवीन संधी शोधणार्यांसाठी आणि जागतिकीकरणाच्या युगात स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी यामुळे उपलब्ध होणार असल्याचे प्राचार्य डॉ.एच.एन.कुदाळ यांनी सांगितले.

युनिक विजन नॉलेज लिंक प्रा.लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजाराम वाडगे व त्यांच्या सहकार्यांनी महाविद्यालयाला भेट देऊन उपलब्ध अभ्यासक्रमांची माहिती घेतली.महाविद्यालयामध्ये आणि कंपनीमध्ये विध्यार्थ्यांना औद्योगिक अनुभव मिळविण्यासाठी सांमज्यस करार झाला असून संयुक्त विद्यमानाने येथे फॉरेन लॅग्वेज सेंटरची स्थापना करण्याचे ठरले.या भेटीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी वाडगे यांनी युनिक विजन संस्थेमार्फत चालणा-या विविध उपक्रमांची माहिती  दिली. उद्योगविश्व आणि शैक्षणिक अभ्यासक्रम यातील अंतर कमी कसे करता येईल यावर भर दिला तसेच विद्यार्थ्यांना नामाकिंत कपन्यामध्ये इंडस्ट्री प्रोजेक्ट कसे मिळवता येईल याचे मार्गदर्षन दिले.स्पर्धेच्या युगात अधिक कौशल्य आत्मसात करुन उत्तम गुणवत्तेसोबत फॉरेन लॅग्वेज जानकरांचे महत्व महाविद्यालयाचे रोजगार व प्रशिक्षण अधिकारी प्रा.आर.एस.पानसरे यांनी सांगितले.जागतिकीकरणातील या संधींचा विचार करता युवांनाही रोजगारांच्या नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात या हेतूने, महाविद्यालयाने फॉरेन लॅग्वेज सेंटरस सुरु केल्याचे प्राचार्य कुदळ म्हणाले.विभागप्रमुख प्रा.व्ही.जी.भामरेएस.पी.बडगुजर,पी.पी.रोकडे,आय.आर.षेख, आर.जी.दाभाडे, व्ही.एन.उबाळे, आर.एस.काळे यांनी संयोजन केले.


फोटोमेल Yeola 12_9

बाभूळगाव : एसएनडी अभियांत्रिकी महाविद्यालयात फॉरेन लॅग्वेज सेंटर स्थापण्याच्या निर्णयानतर एकत्र आलेले युनिक विजनचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजाराम वाडगे,प्राचार्य डॉ.एच.एन.कुदाळ आदि


थोडे नवीन जरा जुने