दिंडी निघणार आहे काव्य संग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर



दिंडी निघणार आहे काव्य संग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर
 येवला : प्रतिनिधी
येथील विद्रोही कवी प्रा. शिवाजी भालेराव यांच्या दिंडी निघणार आहे या काव्य संग्रहास वाड्:मयीन चळवळीशी बांधीलकी जपणारा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय जे. के. जाधव साहित्य पुरस्कार जाहिर झाला आहे.
वैजापूर जिल्हा औरंगाबाद येथील जे. के. जाधव कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने राज्यातील दर्जेदार काव्य संग्रहाला हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराचे वितरण २३ रोजी दुपारी १२ वाजता अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. दत्ता भगत यांच्या हस्ते समारंभपूर्वक वैजारपूर येथे एका विशेष समारंभात करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक डॉ. भीमराव वाघचौरे यांनी दिली आहे. पाच हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुपआहे. या आगोदर दिंडी निघणार आहे, या काव्य संग्रहाला बडोदा येथील मराठी वाड्:मयीन परिषदेच्या वतीने देण्यात येणारा अभिरुची गौरव पुरस्कार मिळाला आहे.
शिवाजी भालेराव हे धामोडे ता. येवला येथील मातोश्री पार्वताबाई ठमाजी गायकवाड संचलित गुरुदत्त माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असून ते पुढारीचे वार्तााहर ही आहेत. त्यांच्या या सन्मानाबद्दल माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ,  संस्थापक तथा बाजार समितीचे माजी सभापती रामदास गायकवाड, भागवत गायकवाड, सरपंच नानासाहेब भड, मुख्याध्यापक अर्जून घोडेराव, शशिकांत गायकवाड, पत्रकार संघाचे अध्यक्ष राकेश गिरासे, सुनील गायकवाड, संतोष विंचू, दत्ता महाले, अविनाश पाटील, संजय लोणारी, मनोज पटेल, रविंद्र करमासे, कुमार गुजराथी यांनी अभिनंदन केले आहे.

थोडे नवीन जरा जुने