महाराष्ट्र राज्य कापुस पणन महासंघ सल्लागार समिती संचालकपदी भागुनाथ उशीर यांची नियुक्ती... अॅड. माणिकराव शिंदे यांनी हालवली सुत्र...

महाराष्ट्र राज्य कापुस पणन महासंघ सल्लागार समिती संचालकपदी भागुनाथ उशीर यांची नियुक्ती...  

अॅड. माणिकराव शिंदे यांनी हालवली सुत्र...

येवला : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य कापुस उत्पादक पणन महासंघाच्या जळगाव विभागाच्या सल्लागार समिती संचालकपदी शेतकरी प्रतिनिधी म्हणून येवला तालूका खरेदी विक्री संघाचे विद्यमान अध्यक्ष भागुनाथ उशीर यांची नियुक्ती कापुस पणन महासंघाच्या संचालक मंडळाच्या सर्वसंमतीच्या निर्णयाने महाराष्ट्र राज्य कापुस उत्पादक पणन महासंघाच्या अध्यक्षा सौ. उषाताई शिंदे यांनी खेतान भवन, मुंबई येथे केली आहे.

राज्यात जळगाव, औरंगाबाद, परळी, परभणी, नांदेड, खामगाव, अकोला, अमरावती, यवतमाळ,वणी , नागपुर असे एकून ११ विभाग आहे. या प्रत्येक विभागात सल्लागार समिती संचालक पदी शेतकरी प्रतिनिधीची नियुक्ती केली जाते. जळगाव विभागातील नाशिक, जळगाव , धूळे, नंदूरबार या जिल्ह्यातुन शेतकरी प्रतिनिधी म्हणून भागुनाथ उशीर यांची निवड व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघ जळगाव विभाग संचालक संजय मुरलीधर पवार यांनी अध्यक्ष व कार्यकारी संचालक यांचेकडे शिफारस केली होती. कापुस पणन महासंघाच्या अध्यक्षा सौ. उषाताई शिंदे यांनी हि नियुक्ती जाहिर केली आहे.

भागुनाथ उशीर यांच्या जळगाव विभागाच्या सल्लागार समिती संचालक पदी नियुक्ती झाल्याने नाशिक, जळगाव, धूळे ,नंदूरबार या जिल्हातील कापुस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या व प्रश्न या माध्यमातून कापुस पणन महासंघाकडे व महाराष्ट्र शासनाकडे मांडल्या जाणार आहे. येवला तालूका खरेदी विक्री संघात चेअरमनपदी नेत्रदिपक कामगिरी करून संघाला उर्जित अवस्थेत आणणाऱ्या भागुनाथ उशीर यांनी नुकताच आर्वतन पद्धतीने राजीनामा सहाय्यक निबंधक येवला यांचेकडे सुपूर्त केला असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉग्रेस जेष्ठ नेते अॅड. माणिकराव शिंदे यांनी सुत्र हालवून भागुनाथ उशीर यांची नियुक्ती घडवून आणत तालूकास्तरिय राजकारणाबरोबरच राज्यस्तरिय संस्थेत कामकाज करण्याची संधी दिली आहे.

या निवडीबद्दल कापुस पणन महासंघाचे उपाध्यक्ष प्रसेन्नजित पाटिल, जळगाव विभाग संचालक संजय पवार, औरंगाबाद विभाग संचालक अॅड. गंगाधर दसपूते, संचालक भारत चामले, कार्यकारी संचालक नविन सोना, व्यवस्थापकिय संचालक आर.एच. शहा, जळगाव विभागीय आधिकारी आर.जी. होले आदींनी अभिनंदन केले आहे.
थोडे नवीन जरा जुने