गटशिक्षणाधिकारी मनोहर वाघमारे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा ठराव
येवला : प्रतिनिधी
तालुका गतशिक्षण अधिकारी हे तालुक्यातील संपूर्ण शाळांचे कर्मचारी नियोजन करून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही यासाठी असतात. मात्र वारंवार लोकप्रतिनिधी यांनी सूचना करूनही गटशिक्षण अधिकारी यांनी शाळांवर लक्ष न दिल्याने हजारो विद्यार्ध्याचे नुकसान झाले आहे.मुरमी येथे 84 विद्यार्थी 1 शिक्षक, सोमठांजोश येथे 86 विद्यार्थी 2 शिक्षक आहेत तर पवार वस्ती येथे 11 विद्यार्थी 2 शिक्षक आहेत, अंकाई पाटी, कुडके वस्ती येथे 8 विद्यार्थ्यांना 2 शिक्षक आहेत.हीच परिस्थिती अनेक शाळांवर आहे.
येवला तालुक्यात गटशिक्षण अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा खेळखंडोबा झाला असून या प्रकाराला गटशिक्षणाधिकारी मनोहर वाघमारे यांना जबाबदार धरून सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा ठराव सर्वानुमते करण्यात आला असून या ठरावांमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे
या संदर्भात अधिक माहिती अशी की गटशिक्षणाधिकरी येवला यांनी गत महिन्यात ऑगस्ट महिन्याचे वेतन सुमारे आठ ते दहा दिवस उशिरा केल्याने जिल्हा परिषद शिक्षकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार सर्व अधिकारी कर्मचारी स्वच्छ भारत सर्वेक्षण योजनेत सहभाग घेतला मात्र गटशिक्षणाधिकारी या कार्यक्रमात कुठेही सहभागी झाल्याचे दिसून आले नाही त्यामुळे त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेश हरताळ फासल्याचे दिसून येत असल्याचे या ठरावात म्हंटले आहे जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना १५ १५ दिवस कार्यमुक्त करत नाहीत या शिक्षकांना वारंवार कार्यालयात चकरा मारायला लावून मानसिक छळ करतात असा उल्लेखही या ठरावात करण्यात आला आहे संपूर्ण तालुक्यात शिक्षकांच्या जागा रिक्त असून या साठी गटशिक्षणाधिकरी यांनी पाठपुरावा करावा असा ठराव अनेकदा करण्यात आला मात्र या जागा भरण्यासाठी गटशिक्षण अधिकारी यांनी कोणताही पाठपुरावा केला नसल्याचे दिसून आले नाही तसेच शिक्षण अधिकारी त्यांच्या कक्षाची चावी सोबत घेऊन जात असल्याने व कार्यालयात उपस्थित नसतात त्यामुळे अनेकदा कार्यालयीन कामकाजात अडथळा निर्माण होतो या सर्व कारणांमुळे व मुलांच्या शिक्षणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने त्यांना त्वरीत सक्तीच्या रजेवर पाठवण्यात यावे असा ठराव प स सदस्य मोहन शेलार यांनी मांडला व त्यास सर्व सदस्यांनी एकमुखी पाठिंबा दिला.
XxxxxxxxxxxxxxxXxxxxxxxxxxxxxx
गटशिक्षण अधिकारी मनोहर वाघमारे यांच्या कार्यपद्धतीने हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे, शासकीय कामात सुसूत्रता नाही ,कर्मचारी यांना देखील सन्मानाची वागणूक मिळत नाही ,पालक, शिक्षक, कर्मचारी, लोकप्रतिनिधी सर्वजण त्यांच्या कार्यपद्धतीने त्रस्त आहेत, त्यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा ठराव सर्वानुमते करण्यात आला आहे .....मोहन शेलार. पंचायत समिती सदस्य ,येवला