धडपड मंच आयोजीत महालक्ष्मी सजावट स्पर्धेचे बक्षिस वितरण संपन्न

धडपड मंच आयोजीत महालक्ष्मी सजावट स्पर्धेचे बक्षिस वितरण संपन्न

येवला : प्रतिनिधी
गौराई माझी लाडाची लाडाची गं' असे म्हणत माहेरवाशीण असलेल्या गौरींचे शहरातील शेकडो घरात आगमन झाले.  उभ्या आणि बैठ्या स्वरूपात गौरींची विविध रूपे यावेळी बघायला मिळाली. याप्रसंगी गौरींच्या भोजन सोहळ्याबरोबरच महिलांचा हळदी-कुंकवाचा समारंभदेखील मोठ्या उत्साहात साजरा झाला.  गणपती समोर सामाजिक प्रबोधन करणारे अन समाजाला संदेश देणारे, सोबतचे चांगल्याचे कौतुक, तर वाईटावर प्रहार करणारे देखावे तसे नवीन नाही. परंतु घरातील महालक्ष्मी असे अप्रतिम देखावे साकारले गेेले तर नक्कीच अप्रुप वाटेल.  असे नेत्रदिपक आणि मोहिनी घातलेले देखावे महिलांच्या कल्पकतेतुन साकारण्यांत आले होते.  निमित्त होते ते धडपड मंचतर्फे घेण्यांत आलेल्या गौरी सजावट स्पर्धेचे.  गेल्या २४ वर्षापासुन व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांच्या पुढाकारातुन हि स्पर्धा नियमित संपन्न होते. 
या स्पर्धेसाठी पारंपारीक पद्धतीच्या सजावटी सोबत अनेक देखावे सादर  केले होते  विशेष म्हणजे यातील पुष्कळसे देखावे हे चल देखावे होते.  घरोघर हे देखावे पाहण्यासाठी अबालवृद्धांनी गर्दी केली होती.
ह्या स्पर्धेत एकुण ४५ महिला स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी प्रथम १४ क्रमांक अनुक्रमे ज्योती बाबर, माया टोणपे, पल्लवी ढोपरे, उषा पैंजणे, निलीमा झोन्ड, सुरेखा वरोडे, रोहिणी दोडे, कोमल बाबर, रेखा लाड, अनिता विधाते, अंकिता भावसार, वासंती जोशी, रेखा कोष्टी, वंदना कांबळे, ह्या विजेत्या ठरल्या.
विजेत्या स्पर्धकांपैकी प्रथम तीन क्रमांकाना सेमी पैठणी व उर्वरित विजेत्यांना  गृहउपयोगी आकर्षक वस्तु व स्मृतिचिन्ह देण्यात आले. तसेच सहभागी सर्व स्पर्धकास आकर्षक वस्तु देण्यांत आले.  परिक्षक म्हणून शैला कलंत्री, राजश्री पहिलवान यांनी काम पाहिले. 
बक्षिस समारंभ कार्यक्रम येथील बालाजी मंदिरात पार पडला.  येवले नगरपरिषदेच्या  मुख्याधिकारी संगीता नांदुरकर यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यांत आले.  प्रास्ताविक व आभार प्रभाकर झळके यांनी मानले. यावेळी प्रितिबाला पटेल, दिपक पाटोदकर, मुकेश लचके, गोपाळ गुरगुडे, श्रीकांत खंदारे, मयूर पारवे, रमाकांत खंदारे, गणेश चव्हाण, गोपी दाणी, अक्षय पारवे, प्रशांत सोनवणे आदी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने