देशमाने ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंचपदी रोहिणी गोरे यांची बिनविरोध निवड
येवला : प्रतिनिधी
देशमाने ग्रुप ग्रामपंचायत आवर्तन पद्धतीने उपसरपंचपदी रोहिणी गोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली यासाठी सकाळी विशेष सभेचे नियोजन करण्यात आले होते फॉर्म भरून ग्रामविस्तार अधिकारी ए. के साळुंखे यांच्याकडून हरकतीची सूचना देण्यात आल्यानंतर उपस्थित ८ सदस्यांपैकी कुणीच हरकत नोंदवली नाही त्यानंतर लगेचच रोहिणी गोरे यांच्या नावाची उपसरपंच पदी निवड करण्यात आल्याचे घोषित करण्यात येऊन नामनिर्देशन पत्र देण्यात आले दरम्यान माजी उपसरपंच भारत बोरसे यांचा राजीनामा गेल्या आठवड्यात स्वीकारण्यात आला होता
निवडणूक वेळी उपस्थित सदस्य सरपंच विमल शिंदे, मा, उपसरपंच भारत बोरसे,शिवाजी शिंदे, मंदाकिनी वाघ,विठाबाई व्यापारी बेबी पवार, आप्पासाहेब शिंदे तर सदस्य योगेश गांगुर्डे, आप्पासाहेब पवार, संजीवनी गांडोळ अनुपस्थित राहूने तटस्थ राहिले.
सदर निवड बिनविरोध व्हावी यासाठी सरपंच विमल शिंदे भागवत राठोड,शांताराम साळी,नाना गोरे, नाना व्यापारी, सखाहरी गोरे,प्रकाश काळे ,संतोष वाघ आदींनी प्रयन्त केले.तर ग्रामपंचायत वसुली अधिकारी अर्जुन पवार, शिपाई बबन पवार उपस्थित होते
फोटो: उपसरपंच रोहिणी गोरे यांचा सत्कार करताना सरपंच विमल शिंदे सदस्य भारत बोरसे,शिवाजी शिंदे, अप्पसाहेब शिंदे आदी