येवल्यात युवकांकारिता काव्यवाचन,एकपात्री अभिनय स्पर्धा साहित्य परिषदेकडून आयोजन,तीन गटात नाव नोंदणीचे आवाहन



येवल्यात युवकांकारिता काव्यवाचन,एकपात्री अभिनय स्पर्धा

साहित्य परिषदेकडून आयोजन,तीन गटात नाव नोंदणीचे आवाहन

 

येवला  : प्रतिनिधी

 येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा,महात्मा फुले अकादमी, नाशिक तसेच शिक्षण विभागाच्या विद्यमाने तालुका स्तरीय काव्यवाचन, आणि एकपात्री अभिनय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. केंद्र, गटनिहाय आणि त्यानंतर तालुका स्तरावर अंतिम स्पर्धा महात्मा फुले नाट्यगृहात आयोजीत करण्यात येणार आहे.स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन साहित्य परिषदेच्या पदाधिकार्यांनी केले आहे.

विद्यार्थी आणि युवकयुवतीतील कलागुणांना संधी मिळावी,त्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्याच्या प्रयत्नांना व्यापक आकार देण्याच्या हेतूने स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याकरिता तालुक्यातील शाळांनी उत्कृष्ट तीन स्पर्धकांची निवड शालेय स्तरावर करून विध्यार्थ्यांच्या नावाची शिफारस स्पर्धा समितीकडे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.स्पर्धेकरिता इयत्ता ५ ते ७,८ ते १२ आणि महाविद्यालयीन आणि मुक्त वयोधीक्य असे तीन गट करण्यात आले आहेत. या स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या स्पर्धकांच्या शाळेला करंडक देण्यात येणार असून स्पर्धकाला रोख बक्षीस आणि प्रमाणपत्र तसेच सन्मानचिन्ह देण्यात येईल.

ही स्पर्धा शिक्षण विभागाच्या ग्रामीण भागातील १६ केंद्रावर केंद्रप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली ११ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहेत.तर येवला केंद्र आणि तिसऱ्या गटातील सर्व स्पर्धकांची स्पर्धा कला व वाणिज्य महाविद्यालय येथे १४ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे.तर गटनिहाय स्पर्धा सप्टेबरच्या शेवटच्या सप्ताहात घेणार आहेत.विद्यालातून दोनही स्पर्धेकरिता एका उत्कृष्ट स्पर्धकांची निवड केंद्रप्रमुखाशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

काव्य स्पर्धेत एक कविता सादर करावयाची असून ती मराठीत व शक्यतो पाठ्य पुस्तकाबाहेरील असावी,काव्य वाचन एकट्यानेच करावयाचे आहे.या स्पर्धेत प्राचार्यांना वाटल्यास ते युवक गटाकरिता माजी विद्यार्थ्याला या स्पर्धेकरिता पाठवू शकनार आहेत. एकपात्री अभिनय स्पर्धेत प्रत्येक स्पर्धकाला कमीत कमी पाच मिनिटे आणि दोन मिनिटे बोनस असा वेळ दिला जाईल.या वेळेत संवाद सादरीकरण करावयाचे आहे,संवाद लेखन नाट्यरूपात असावे.अधिक माहितीसाठी ९४२२७५७६३९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



थोडे नवीन जरा जुने