येवल्यात नटखट बालगोपालांच्या अदाकारीने रंगली श्रीकृष्ण वेशभुषा स्पर्धा

 
येवल्यात नटखट बालगोपालांच्या अदाकारीने रंगली श्रीकृष्ण वेशभुषा स्पर्धा

येवला : प्रतिनिधी
 गोकुळाष्टमी निमित्त येवल्यामध्ये बाळगोपाळांची अनोखी वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांच्या धडपड मंचातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेत १३० बाळगोपाळांनी भाग घेतला. नटखट, गंभीर, खेळकर, बासरीवाला, दहिहंडीतील लोणी खाणाऱा माखणचोर अशी श्रीकृष्णाची अनेक रुपं बाळगोपाळांनी वेशभूषेच्या माध्यातून साकारली. विशेष म्हणजे २ महिन्याच्या बालकापासून ३ वर्षांच्या मुलांनी यात सहभाग घेतला. शेवटी या बाळगोपाळांना बक्षीसांचं वितरणही करण्यात आलं.  स्पर्धेचे हे १३ वे वर्ष होते.  
श्रीकृष्णाचा टोप, त्यावरील डोलणारे मोरपीस, हातांना बाजुबंद, गळ्यात विविध दागीने व फुलांच्या माळा, रंगीबेरंगी विविध पॅटर्नरचे जरतरी शेले, पितांबर अशा विविध प्रकारे सजलेले बाळगोपाल व त्यांच्या लिलांनी या सभागृहाला अक्षरश: गोकुळनगरीचे स्वरुप आले होते. आपल्या लहान, गोंडस, लोभसवाण्या रुपातील मुला-मुलींना पाहुन पालक देखील हरवुन गेले होते. भाग घेणार्‍या प्रत्येक स्पर्धकास भेटवस्तु म्हणुन खेळणी व खाऊ देण्यात आला. 
सहभागी स्पर्धकांधुन विजेते स्पर्धक निवडण्यात आले.  त्यात प्रथम समर्थ गायकवाड, द्वितीय सिमंतीनी शिंदे, तृतिय निलय गुजराथी तसेच उत्तेजनार्थ नमन छताणी, नक्ष छताणी, सिया परदेशी, श्रीपाद चिनगी, विजयलक्ष्मी कोळस, यांचेसह विशेष उत्तजनार्थ असे १६ स्पर्धकांना भेटवस्तु देण्यात आल्या.  तसेच फोटोग्राफर बटाव बंधु यांचे वतीने फोटो देण्यात आले.  या स्पर्धेचे परिक्षक म्हणुन प्रितीबाला पटेल, माया टोणपे, किशोर सोनवणे यांनी काम पाहिले
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नारायण शिंदे तर प्रास्ताविक व आभार प्रभाकर झळके यांनी व्यक्त केले. हा संपुर्ण देखणा कार्यक्रम यशस्वीततेसाठी मुकेश लचके, गोपाळ गुरगुडे, मयूर पारवे, दत्ता कोटमे, अनु पावटेकर, कुणाल ठोंबरे, रमाकांत खंदारे, गणेश चव्हाण, ऋतिक क्षत्रिय, बंडु कोतवाल, प्रशांत सोनवणे आदींनी परिश्रम घेतले. 





थोडे नवीन जरा जुने