येवल्यात गणपती मंदिराची दानपेटीची चोरी
येवला :- प्रतिनिधी
श्री सिद्धी विनायक गणपती मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना मध्यवस्तीत शहरातील मेनरोड वरील बाजार तळातील मंदिरात घडली.
साधारण साडेपाच फुट उंचीची पेटीवर एक फूट उंचीचा पितळी कळस असलेली लोखंडी दानपेटी ही साधारण ४ ते ५ जणांच्या चोरट्यांनी लंपास केली. दानपेटीचा कळस मंदिराच्या मागील बाजूस बाजारतळात तोडून टाकलेल्या अवस्थेत मिळुन आला आहे.
मध्यरात्री २ ते ३ वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याचे मंदिराचे ट्रस्टी यांनी माहिती दिली. सकाळी या बाबत माहिती घेऊन अधिक तपास सुरू असल्याचे शहर पोलिसांनी माहिती दिली. या चोरी मुळे भाविकांमध्ये नागरिकात प्रचंड रोष निर्माण झाला आहे लवकरात लवकर पोलिसांनी तपास लावण्याची मागणी भाविकांकडून होत आहे.