दिवाळी पर्यावरण पूरक साजरी करण्याचा बनकर पब्लिक स्कूलचा संकल्प........

दिवाळी पर्यावरण पूरक साजरी करण्याचा बनकर पब्लिक स्कूलचा संकल्प........

येवला: प्रतिनिधी

दिव्यांची रोषणाई देखण्या रांगोळ्या फराळांचा घमघमाट आणि पारंपारिक वेशात सुरु असणारी सर्वांची लगभग....असे नयनरम्य  चित्र शहराशहरातून दिसते,परंतु सण साजरा करण्याची पद्धत बदलत असताना पर्यावरण पूरकसण साजरा करण्याची गरज ओळखून बनकर पाटील पब्लिक स्कूल मध्ये  दि.३० रोजी पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याचीशपथसर्व विद्यार्थ्यांनी घेतली. शाळेतील विध्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल ह्या उपक्रमातून घडावा यासाठी शाळेमध्ये पर्यावरण पूरक दिवाळी कशी साजरी करता येईल याचे चित्रच जणू उभे केले होते.

शाळेतील मुले कलर ड्रेस मध्ये आले होते.शाळेतील सर्व शिक्षकांनी वेगवेगळ्या प्रकारचे दिवाळीच्याशुभेच्छा देणारे तक्ते तयार करून नोटीस बोर्ड सजवले होते.शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यांनी दिवाळीचे आकाश कंदील, वेगवेगळ्या प्रकारच्या पणत्या करून शाळेची सजावट केली.यावेळी मुलांना असणारी आवड तसेच त्यांच्यात असणारे सुप्त गुण निदर्शनास आले .

या वेळी मुलांना दिवाळीचे भेटकार्डशाळेकडून देण्यात आले.हा सण आपल्या आयुष्यात नाविन्याची बदलांची प्रेरणी करतो नेहमीच्या जीवनातून निवांतपना देतो, संस्कृतीशी जोडण्याचा तो ऐक धागाही असतो,.असे विचार,मूल्य,शाळा सन साजरा करून,तसेच या द्वारे आपली संस्कृती जोपासते. दिवाळी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय,दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सन,दिवाळी म्हणजे अन्यायावर न्यायाचा विजय.असे विचार बनकर पाटील शाळेच्या विध्यार्थ्यास समजून सांगण्यात आले.अश्या प्रकारे या दिवशी मुलांनी दिवाळी शोभेच्या वस्तु स्वताच्या हातांनी बनवून शाळेची सजावट करून दिवाळी सणउत्साहात  साजरा केला .शाळेचे संचालकप्रवीण बनकर यांनी विध्यार्थ्यांना व सर्व शिक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शूभेच्या दिल्या.यावेळी शाळेचे प्राचार्य पंकज निकम, दीपक देशमुख तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्तीत होते.

 

थोडे नवीन जरा जुने