सायगाव येथील तरुणांनी वाचवले घोड्याचे प्राण

सायगाव येथील तरुणांनी वाचवले घोड्याचे प्राण

येवला : प्रतिनिधी
 येथे जनावरांच्या चाऱ्याबरोबरच पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे.  जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही त्यात जनावरे स्वतः पाण्याचा शोध घेत आहे. सायगाव फाटा येथे मगन पठारे यांच्या ५०फूट खोल विहिरीत पाण्याचा शोध घेत घोडा पडला असल्याचे आकाश कोथमिरे यांनी पाहिले.  तसे घोडा विहिरीत पडला असल्याचे मॅसेज व फोटो सर्व व्हाट्स अप ग्रुपवर पाठवले. विहिरीजवळ पाण्याच्या शोधात गेलेला घोडा विहिरीत डोकावत असतांना पाय घसरून पडला असल्याचा अंदाज कोथमिरे यांनी व्यक्त केला. दोन दिवस घोड्याचा शोध घेत कुणीच आले नाही. मग अमोल कोथमिरे, हिरामण पठारे, पवन आहेर, मयूर कोथमिरे, योगेश पठारे, रावसाहेब पठारे, सागर पगारे, मिठू बागुल, पोपट पठारे, उमेश पठारे, सोनू पठारे, सचिन आव्हाड, मुस्कान कांबळे या तरुणांना एकत्र घेऊन कोथमिरे यांनी क्रेन बोलावले. अतिशय सिताफीचे प्रयत्न करून क्रेनच्या साहाय्याने घोडा सुखरूप विहिरी बाहेर काढण्यात तरुणांना यश आले. घोड्याला बाहेर काढून पाणी पाजून सोडून देण्यात आले. एवढा खोल व कोरड्या झालेल्या विहिरीत पडला असतांना देखील घोड्याला किरकोळ दुखापत झाली मात्र मोडतोड कुठेच झाली नाही याचे नवल परिसरातील, गावातील तरुण, जेष्ठ नागरिक यांना झाले. तसेच या तरुणांचे सर्व ग्रामस्थांनी कौतुक केले. म्हणतात ना वेळ आली होती पण काळ आला नव्हता.
थोडे नवीन जरा जुने