समता परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रा. ज्ञानेश्वर दराडेची नियुक्ती राजापूरच्या सामान्य कार्यकर्त्याला भुजबळांनी दिली संधीसमता परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रा. ज्ञानेश्वर दराडेची नियुक्ती
राजापूरच्या सामान्य कार्यकर्त्याला भुजबळांनी दिली संधी

येवला : पुढारी वृत्तसेवा
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या जिल्हा अध्यक्षपदी प्रा.ज्ञानेश्वर दराडे यांची निवड करण्यात आली आहे.राजापूर ग्रामपंचायतचे युवा सदस्य असलेले दराडे 
सर्वसामान्य कार्यकर्ते असून त्यांच्या कामाची,वक्तृत्वाची व निष्ठेची दखल घेऊन समता परिषदेचे संस्थापक पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ही संधी दिली आहे.
आज भुजबळ फार्म येथे समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्रप्रदान करण्यात आले.प्रा.दराडे हे कट्टर भुजबळ समर्थक असून ते फुले,शाहू,आंबेडकर,सत्यशोधक विचारसरणीचे असून त्यांनी समता परिषद व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध पदावर काम केले आहे.राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष,समता परिषद प्रदेश प्रचारक,राष्ट्रवादी काँग्रेस स्टार प्रचारक अशी विविध संघटनात्मक जबाबदारी ते पार पाडत आहेत.यासोबतच येवला कृषी उत्पन्न बाजार समित,राजापूर ग्रामपंचायतचे सदस्य म्हणून देखील कामाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे
दराडे हे सर्वसामान्य कुटुंबातील असून अतिशय सर्वसामान्य व कुठलाही राजकीय वारसा नसताना केवळ भुजबळावर निष्ठा ठेऊन त्यांचा राजकीय प्रवास सुरु असताना संघटनेने त्यांच्यावर विश्वास ठेवून जबाबदारी टाकली असल्याचे मानले जाते.
शालेय व महाविद्यालयीन जीवनापासून राजकीय सामाजिक बांधिलकी जपत महाविद्यालयीन निवडणूका देखील त्यांनि जिंकल्या आहेत.संघटनेसाठी एस.टी. बसने राज्यभर फिरून काम करणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे.
भुजबळांच्या बालेकिल्यातील कार्यकर्त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड ही महत्वपूर्ण मानली जात आहे.प्रदेश कार्यकारिणीत कामाचा अनुभव,टीव्ही मिडियावरील चर्चांमध्ये सहभाग,उत्कृष्ट वक्तृत्व नियोजन व संघटन आणि निष्ठा  ह्या गुणांनी त्यानि आपले कर्तृत्व सिद्ध केल्यानं त्यांना भुजबळांनी संधी दिल्याचे बोलले जाते.
आज नियुक्तीपत्र प्रदान करतांना प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे,बाळासाहेब कर्डक, जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार,महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे,गटनेते डॉ. मोहन शेलार,ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर,जालना जिल्हा अध्यक्ष नवनाथ वाघमारे,प्रदेश प्रचारक नागेश गवळी,संतोष वीरकर,शहराध्यक्ष रंजन ठाकरे,लक्ष्मण दराडे,राजापुरचे सरपंच दत्ता सानप,माजी सरपंच सूभाष वाघ,शरद वाघ,आशपक सय्यद,गणेश सानप,गोकुळ वाघ,प्रफुल मालपुरे,राकेश पवार,डॉ.पंकज शिंपी,महेश गुरव आदी उपस्थित होते.

"विचारांवर निष्ठा ठेऊन काम हाती घेतले की नक्की कामाची दखल होते.
पालकमंत्री छगन भुजबळांनी माझ्या कार्याची दखल घेतली.माझ्यावर विश्वास ठेवून टाकलेली जबाबदारी मी निष्ठने पार पाडून समतेसाठी काम करणार आहे.
-प्रा.ज्ञानेश्वर दराडे,जिल्हाध्यक्ष,समता परिषद

थोडे नवीन जरा जुने