हनुमान अजून देखील शाश्वत ज्याला जिथे वाटेल त्याने पूजा करावी : पालक मंत्री छगन भुजबळ

हनुमान अजून देखील शाश्वत ज्याला जिथे वाटेल त्याने पूजा करावी : पालक मंत्री छगन भुजबळ

येवला : पुढारी वृत्तसेवा
जनता महागाईने त्रस्त आहे शेतकऱ्यांपुढे खुप प्रश्न आहेत अशामध्ये देवांच्या जन्म स्थळाचे पुरावे मागण्याच्या फंदात न पडता जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे असे मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री श्री छगन भुजबळ हे येवला मतदार संघाच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना व्यक्त केले आहे.

भगवान श्री रामा च्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळ असलेले अंजनेरी हनुमानाचे जन्मस्थान नाही असेल तर त्याला पुरावा काय असं किस्किंदा चे महंत आचार्य गोविंद यांनी केले असून सद्या ते नाशिक मध्ये ठाण मांडून आहेत .
महंतांच्या वक्तव्यामुळे भक्तांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार होत नवीन वाद निर्माण झाला आहे.
राज्यामध्ये महागाई बेरोजगारी शेतकऱ्याचे प्रश्न असे अनेक प्रश्‍न असून त्यावर लक्ष देण्याचे काम आमचे सरकारची आहे बाकी हनुमानाचा जन्म कुठे झाला याला महत्त्व न देता ज्याला जिथे वाटेल तिथे त्याने पूजा करावी. असे जन्म स्थळाचे पुरावे मागून वाद निर्माण करू नये आणि त्याचे काय पुरावे देणार असा असा सवाल देखील भुजबळांनी केला.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने