श्री शिवशंभुचे वारकरी परिवाराच्या रक्तदान शिबीरास उत्स्फुर्त प्रतिसाद....


श्री शिवशंभुचे वारकरी परिवाराच्या रक्तदान शिबीरास उत्स्फुर्त प्रतिसाद....

           येवला : 
येथे श्री शिवशंभुचे वारकरी परिवार आयोजित रक्तदान शिबीरात १२१ रक्तदात्यांनी रक्तदान करत उत्स्फुर्त असा प्रतिसाद दिला.येवला पंचायत समिती सभापती प्रविणजी गायकवाड यांनी परिवारातील सर्व शिलेदारांच्या पाठीवर उत्कृष्ट आयोजनासाठी कौतुकाची थाप टाकली.निस्वार्थी पणे आपलं कार्य असच सुरु ठेवाव तसेच ग्रामीण भागातील तरुण एकत्र येत इतक सुंदर काम करतात हे नक्कीच कौतुकास्पद आहे असे परिवाराला संबोधताना कोपरगाव पोलिस उपनिरीक्षक दाते सर,महेंद्र पाटील यांनी उदगार काढले.
                एकदिवस सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी या उपक्रमातंर्गत परिवाराच्या वतीने सर्वाचे वाढदिवस महिन्याच्या शेवटी सामाजिक उपक्रम राबवत साजरा केला जातो.मे महिन्यातील सर्वांचे जन्मदिवस हे रक्तदान शिबीराचे आयोजन करुन साजरे करण्यात आले अशी माहिती संस्थापक गोरख कोटमे यांनी दिली.रक्तदान शिबीर यशस्वी होण्यासाठी छावा क्रांतीवीर सेना,छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती,हिंदुराष्ट्र सेना (युगप्रवर्तक),शिवभारत सप्ताह समिती,टायगर ग्रुप गोरख कोटमे व सागरनाईकवाडे मित्रपरिवार त‌सेच विविध शिवविचार प्रेमी संघटनेच्या बंधु भगिणीचे योगदान लाभले.
थोडे नवीन जरा जुने