बनकर पाटील पब्लिक स्कूलमध्ये गोकुळष्टमी उत्साहात साजरी.

बनकर पाटील पब्लिक स्कूलमध्ये गोकुळष्टमी उत्साहात साजरी.

येवला : पुढारी वृत्तसेवा
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच सांस्कृतिक प्रगतीवरही भर देणाऱ्या अंगणगाव येथील बनकर पाटील पब्लिक स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागातर्फे गोकुळष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी शाळेमध्ये दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या नावासह सजविण्यात आलेली दहीहंडी सर्वांचे आकर्षण ठरली. विद्यार्थ्यांना भारतीय सणांविषयी माहिती व्हावी हा या कार्यक्रमामागील उद्देश होता.
याबरोबरच पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी दहीहंडी व बालकृष्णाचे चित्र रंगविण्याचा उपक्रम यावेळी घेण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी आकर्षक रंगकाम सादर करत आपल्या मनातील बालकृष्ण रंगविला. यावेळी शाळेतील चिमुकले राधा-कृष्णाच्या मनमोहक वेशभूषेत आले होते. सदर वेशभूषेत आलेल्या बालगोपालांनी गौळणींवर नृत्य सादर केले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी फोडण्याच्या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी मनोरा रचून दहीहंडी फोडण्याचा आनंद घेतला. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना दहीहंडीचा प्रसाद व चॉकलेट वाटप करण्यात आले.
गोकुळष्टमीनिमित्ताने संस्थेचे अध्यक्ष प्रवीण बनकर यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. प्राचार्य पंकज निकम यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी शिक्षिका भावना करंडे, वृषाली पानगव्हाणे, सुवर्णा अहिरे व जयश्री गिलबिले आदींनी विशेष परिश्रम घेतले. 

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने