पावती न देणाऱ्या रेशन दुकानदारवर कारवाई करण्याची वंचित बहुजन आघाडी ची मागणी


 पावती न देणाऱ्या रेशन दुकानदारवर कारवाई करण्याची वंचित बहुजन आघाडी ची मागणी

येवला : पुढारी वृत्तसेवा
  शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत अंतोदय व पिवळी शिधापत्रिका  प्राधान्य कुटुंब लाभार्थी अशा गटातील शिधापत्रिका धारकांना सवलतीच्या दरात रेशन वाटप केले जात होते.  परंतु कोरोनाचा संकटाचा काळात अनेक लोक बेरोजगार झाले व कोणीही उपाशी राहू नये म्हणून केंद्र सरकारने रेशन कार्ड नसलेल्यांनाही  मोफत धान्य वाटप केले. अद्यापही शिधापत्रिका धारकांना सवलतीच्या दरात तसेच मोफत धान्य वाटप केले जाते परंतु रेशन दुकानदार स्वतःच्या फायद्यासाठी आपल्या सवडीनुसार व वेळेनुसार महिन्याच्या शेवटी दोनच दिवस धान्य वाटप करण्याची घाई करून थम मशीन बंद असल्याचे सांगून धान्य वाटप केले जाते कदाचित
मशीन चालू असले तरी दुकानदार पावती देत नाहीत. नेहमीच या मशिन ची रेंज गायब , सर्वर डाऊन कारणे देत पावती नाकारली जाते 
यामुळे ग्राहकांचा हक्क व अधिकारावर गदा  आलेली आहे म्हणून पावती न देणाऱ्या दुकानदारावर योग्य ती चौकशी करून कारवाई  करण्याची मागणी वंचित चा वतीने निवेदनाद्वारे तहसीलदार प्रमोद हिले यांचा कडे करण्यात आली.
    शिधापत्रिका धारकांची  फसवणूक होऊ नये  व रेशनचा होणारा काळा बाजार रोखण्यासाठी ई प्रणाली विकसित करून रेशन धान्यात पारदर्शकता यावी यासाठी रेशन वाहतूक व्यवस्था (GPS)
जी पी एस प्रणालीने करण्याचा   मोठा गाजावाजा  शासन दरबारी करण्यात आला होता परंतु तो कागदावरच नाचला की काय  ? म्हणून ह्या दुकानदारावर  पुरवठा विभागाचा धाक नसल्याने सवलतीचा दरात येणारा कोठा व मोफत धान्य वाटप कोठा यातून एकच कोठा धान्य वाटप केले जाते. एक गायब केला जातो व  पावत्या दिल्या जात नाहीत म्हणून पावत्या देण्याचे आदेश आपल्या अधिकारात काढावे  व पालन न करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात यावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी चा वतीने  शिधापत्रिका धारक ग्राहकांचे हित साधण्यासाठी तालुक्यातील गावा गावात जाऊन रेशन दुकानदार यांचा या मनमानीला आळा घालण्यासाठी आंदोलन करण्याचा इशाराही  यावेळी निवेदनाद्वारे वंचित बहुजन आघाडीचा  वतीने  देण्यात आला . 
यावेळी तालुकाध्यक्ष संजय पगारे, उपाध्यक्ष मुक्तार भाई तांबोळी, युवा नेते माजी उपसरपंच शशिकांत जगताप,ज्येष्ठ नेते भाऊ लहरे,  शहराध्यक्ष गफार भाई शेख ,युवक जिल्हा  उपाध्यक्ष दयानंद जाधव, वसंत घोडेरावं, युवक तालुका अध्यक्ष प्रवीण संसारे, साहेबराव भालेराव , दिवाकर वाघ,नितीन संसारे,रोहन संसारे,.यांच्यासह महिला आघाडीचा वालहुबाई जगताप उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने