येवल्यात काँग्रेस पक्षातर्फे आजादी गौरव पदयात्रा व स्वातंत्र्य सैनिकांचे वारसांचा सन्मान सोहळा संपन्न

येवल्यात काँग्रेस पक्षातर्फे आजादी गौरव पदयात्रा व स्वातंत्र्य सैनिकांचे वारसांचा सन्मान सोहळा संपन्न


येवला : पुढारी वृत्तसेवा
      देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त येवला तालुका व शहर काँग्रेस कमिटीतर्फे ९ ऑगस्ट या क्रांती दिनाच्या निमित्ताने आझादी गौरव पदयात्रा व स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सन्मान सोहळा हुतात्मा स्मारक, येवला येथे संपन्न झाला.
      सन्मान सोहळ्याची व आजादी गौरव पदयात्रेची सुरुवात स्वातंत्र्य सेनानी सेनापती तात्या टोपे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन करून झाली.
      कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे हे होते तर सन्मान सोहळ्याचे व आजादी गौरव पदयात्रेचे उद्घाटन काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिगंबर गीते, प्रदेश सचिव रमेश कहांडोळे ,अनुसूचित जाती जमाती काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, धर्मराज जोपळे हे उपस्थित होते.
     यावेळी स्वातंत्र्य सेनानी यांचे वारसदार शशिकांत गुळसकर, अनिल  तरटे, मुकुंद पोफळे, सौ. कावेरी दोडे, शैलेश देसाई, राजेंद्र मोहरे, कृष्णकांत गुजराथी, अनिल मुथा, मीरा माळी, गंगाधर लोखंडे, गणेश पराते, अभिजीत भागवत, रवींद्र खैरनार, ऋषिकेश पवार आदींचा यथोचित सन्मान करण्यात आला तसेच 1971 च्या भारत पाक युद्धात वीर चक्र प्राप्त झालेले कचरू साळवे यांचा सन्मानही यावेळी करण्यात आला.
     कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणात डॉ. शेवाळे म्हणाले की देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी तुरुंगवास भोगला त्याचप्रमाणे इंग्रजांशी अविरतपणे संघर्ष करून देशाला स्वातंत्र्य मिळून दिले. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात देशाच्या जडणघडणीमध्ये काँग्रेस पक्षाचा मोलाचे योगदान आहे. सेनापती तात्या टोपे अठराशे सत्तावनच्या लढ्याचे प्रणेते होते. महात्मा गांधीजींनीही अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळून दिले परंतु आज चे सत्ताधारी देशाचा खरा इतिहास पुसू पाहत आहे. काँग्रेस पक्षाला देशाला स्वातंत्र्य मिळून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांविषयी नेहमीच अभिमान व गर्व राहिलेला आहे. त्यामुळेच काँग्रेस पक्षातर्फे संपूर्ण देशांमध्ये आझादी गौरव पदयात्रा व स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मान सोहळा आयोजित केलेले आहे.
      उदघाटणीय भाषणामध्ये प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे म्हणाले की, स्वातंत्र्य सैनिकांविषयी काँग्रेस पक्षाने नेहमीच ऋण व्यक्त केलेले आहे. इंग्रजांनी या देशाला लुटून नेले होते परंतु या देशाला महासत्ता बनवण्यामध्ये काँग्रेस पक्षाचा मोठे योगदान दिलेले आहे.
     कार्यक्रमाची प्रास्ताविक शहराध्यक्ष प्रीतम पटणी यांनी केले. सूत्रसंचालन नानासाहेब शिंदे यांनी तर आभार सुरेश गोंधळी यांनी मानले.
     यावेळी दिगंबर गीते, ज्ञानेश्वर काळे, ॲड. दिलीप कुलकर्णी, तालुकाध्यक्ष ॲड.समीर देशमुख, सौ. कावेरी दोडे, कृष्णकांत गुजराती आदींनी मनोगत व्यक्त केले.          
      कार्यक्रमास काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मांजरे, बळीराम शिंदे, दत्तात्रय चव्हाण, उमेश कंदलकर, गणपत शिंदे,  विलास नागरे, संजय मिस्त्री, सुखदेव मढवई, भाऊराव दाभाडे, भाऊसाहेब कदम, अमित पटणी, समीर शेख, अण्णासाहेब पवार, मुकेश पाटोदकर, बाबासाहेब शिंदे, बाळासाहेब सोनवणे, राजेंद्र गणोरे, जयप्रकाश वाघ, अक्षय शिंदे, दत्तू भोरकडे, शिवनाथ खोकले, मारुती सोमासे, गणेश ढिकले, श्रावण राजगिरे, जालिंदर भोरकडे, ॲड. विठ्ठल नाजगड, ॲड. दीपक बहादुरे, नारायण दोडे, अतुल पोफळे, भिवनाथ बोरजे, विराज देशमुख, विशाल वाकचौरे, ओम वडे, कैलास भोरकडे, अनुज मगर,  गुड्डू गणोरे      आदी सह पदाधिकारी मोठे संख्येने उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने