जनकल्याण सेवा समितीकडून आदिवासी भगिनींना रक्षाबंधनाची अनोखी भेट

जनकल्याण सेवा समितीकडून आदिवासी भगिनींना रक्षाबंधनाची अनोखी भेट

येवला -  पुढारी वृत्तसेवा
येथील जनकल्याण सेवा समितीच्या वतीने खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकीचे नाते जपून रक्षाबंधन साजरा करण्यात आला. भावाला राखी बांधली नाही व भावाने भेट दिली नाही तर नक्कीच मनाला बोचते. भावापासून दूर असणाऱ्या गरीब भगिनींना दुःख सलू नये म्हणून येवला येथील जनकल्याण सेवा समितीच्या वतीने दहेगांव धूळ येथील ६२ कष्टकरी भगिनींना रक्षाबंधनाच्या निमित्ताने राखी बांधून घेऊन त्यांना साडी चोळीची भेट देण्यात आली.

सतत समाज उपयोगी उपक्रम राबवून आदिवासी व गोरगरीब लोकांवर आभाळमाया करणारे व्यक्तिमत्व म्हणुन संपूर्ण येवला तालुक्याला श्री. नारायणमामा शिंदे यांचा परिचय आहे. गेल्या २० वर्षांपासून मामा समितीच्या सदस्यांसह समाजातील दुर्लक्षित भगिनींकडून औक्षण करून त्यांच्या हातून राखी बांधून घेतात व त्यांना साडीचोळीची भेट देतात. यावर्षी हा उपक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या पवित्र दिनी भावाचे प्रेम भगिनींना मिळावे व बहिणीचे प्रेम व आशीर्वाद भावाला मिळावे, त्यांच्या प्रेमाची व मायेची साद मिळावी ह्या उद्दात हेतूने हा उपक्रम मामांनी राबविला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. प्रभाकर झळके सर होते तर प्रमुख पाहूणे म्हणून ज्येष्ठ नागरीक संघाचे

अध्यक्ष श्री. राजेंद्र आहेर, गोविंदराव खराडे, भोलाशेठ लोणारी, सुरजमल करवा, दिगंबर कुलकर्णी, सुदाम दाणे

साहेब, किशोर कुमावत, बाळासाहेब पाटोदकर, मुकेश लचके, सुधाकर भांबारे, राजेंद्र ताठे, मालपुरे सर आदी

उपस्थित होते. याप्रसंगी प्रभाकर झळके व नारायणमामा शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर प्रा. दत्ता

नागडेकर यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी लहान मुला-मुलींना बिस्किट पुडे व चॉकलेटचे वाटप करण्यात आले.

गावकऱ्यांच्या वतीने संतोष ढोकाडे सर यांनी स्वागत व सुत्रसंचालन केले. याप्रसंगी गावातील आप्पासाहेब गायकवाड, दशरथ माळी, भाऊसाहेब गायकवाड, संतोष लोहकरे, छाया गाडे, माया गाडे, वडीतके आदी सह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने