श्री क्षेत्र पारेगाव ते श्री क्षेत्र पैठण पायी दिंडीचे सोहळ्याचे 48 वे वर्ष पूर्ण ........

श्री क्षेत्र पारेगाव ते श्री क्षेत्र पैठण पायी दिंडीचे सोहळ्याचे 48 वे वर्ष पूर्ण .........

येवला : पुढारी वृत्तसेवा
पैठण ता. जिल्हा औरंगाबाद येथे संत एकनाथ महाराज यांच्या नाथ षष्टी सोहळ्या निमित्त गेल्या 47 वर्षापासून ह.भ.प कै विठ्ठलतात्या खिल्लारे यांनी सुरु केलेल्या पारेगाव ते पैठण या दिंडी सोहळ्यास आज 48 वर्षे पूर्ण झाली आहे . येवला तालुक्यातील पारेगाव येथील
वै ह भ प विठ्ठल तात्या यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र  जनार्धन विठ्ठल खिल्लारे हे गेल्या सात वर्षांपासून दिंडीचे नेतृत्व करत आहे.
दिंडीचे यावर्षीचे प्रस्थान पारेगाव येथून रविवारी झाले असुन् यानंतर कोटमगाव,गवंडगाव,वैजापूर महालगाव,गंगापूर,ढोरेगाव,इसारवाडी आदी गावे एकूण १५० किमी चा पायी चालत कडक उन्हाची तमा न बाळगता नाथभजनाच्या जय घोष करत आणि टाळ मृदुंगाच्या तालावर ठेका घेत घेत असा ८ दिवसांचा मुक्काम करत दिंडी सोहळा नाथ षष्ठीच्या दिवशी पैठण येथे पोहोचणार आहे . 
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या सावटामुळे दिंडी ची सेवा खंडित झाली होती मात्र शासनाने काही अटी व शर्तीच्या अधीन राहून यात्रा उत्सवाला परवानगी दिल्यामुळे यावर्षी मोठ्या उत्साहाने दिंडी सोहळा पुन्हा सुरू झाला आहे

दिंडीत  शेकडो भाविक सहभागी झाले आहे यात महिला आणि अबालवृद्धांची संख्या लक्षणीय आहे दिंडी सोबत प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी पंचाक्रोशीतील प्रसिद्ध कीर्तनकरांच्या कीर्तनाची मेजवानी भाविकांना मिळणार आहे यात ह.भ.प रंगनाथ महाराज महालखेडेकर ,हभप निवृत्ती महाराज चव्हाण,,नामदेव बुवा घोटिकर,,ह.भ.प तात्या महाराज येसगावकर, हभप संगीता चव्हाण,ह.भ.प बापू महाराज पोटे,आदी कीर्तन व प्रवचन सेवा होणार असून
 दरम्यान दिंडी मुक्कामी असलेल्या ठिकाणी व दिंडी मार्गावर नाश्ता व जेवणाची सोय मुक्कामी असलेल्या ठिकाणचे स्थानिक गावकरी मंडळी करतात हि सेवा गेली 47 वर्षापासून अखंडित सुरु आहे व यापुढे देखील अशीच सुरु राहील तसेच सर्व पारेगाव तथा दिंडीत सामील ग्रामस्थांनी या वेळेस दिंडीत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आहे अशी माहिती दिंडीचे व्यवस्थापक हभप बापू महाराज पोटे,  केशव ढगे , दौलत सुरासे , जनार्दन खिल्लारे यांनी दिली आहे

 

सोबत श्री क्षेत्र पारेगाव येथील दिंडी सोहळा प्रस्तानाचे फोटो दिले आहेत
थोडे नवीन जरा जुने