मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून येवल्यात रस्त्यांची कामे मंजूर

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून येवल्यात रस्त्यांची कामे मंजूर

 विधानसभा प्रमुख अतुल पालवे यांच्या प्रयत्नातून तब्बल साडेनऊ कोटीचा निधी मंजूर.

येवला : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यात विकास कामे कोण मंजूर करून आणते आणि कोण निधी देते याबाबत श्रेय वादाची लढाई आपल्याला अनेकदा बघायला मिळाली आहे परंतु येथील शिवसेनेचे विधानसभा प्रमुख अतुल पालवे यांनी तब्बल साडेनऊ कोटी रुपयाची कामे मंजूर करून आणली आहे. नगरसुल फाटा ते पिंपळखुटे तिसरे रामा 25 हा तब्बल 3.5 किलोमीटर चा रस्ता व येवला नागडे, भारम,वाघाळा छत्रपती संभाजी नगर  रोड हा तब्बल 27 km चा रस्ता असून या रस्त्याची संपूर्णपणे डागडुजी केली जाणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.या रस्त्यांच्या कामासाठी अतुल पालवे यांनी पालकमंत्री दादा भुसे यांचे मार्गदर्शन घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र व्यवहार करून या संदर्भातला निधी तालुक्याच्या कामांसाठी मंजूर करून आणला आहे.यामुळे तब्बल 30 किलोमीटर चा गुळगुळीत रस्ता आता येवले करांना मिळणार आहे त्याबाबत गेल्या पाच महिन्यापासून पालवे हे सतत रस्त्याच्या पाठपुराव्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या भेटी घेत होते अखेर हा संपूर्ण निधी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजने मधून व सार्वजनिक बांधकाम विभाग अर्थसंकल्पाच्या तरतुदीमध्ये या रस्त्यांसाठी निधी मंजूर केला आहे.तालुक्यामध्ये अनेक राजकीय पक्ष छोट्या कामांचा मोठा गावगावा करून राजकीय पोळ्या भाजण्याचं काम मतदार संघात दणकेबाज चालू आहे.या गोष्टीला फाटा देत नुकताच नव्याने शिवसेनेचे काम चालू करून गाव पातळीवरील महत्त्वाचे प्रश्न थेट मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून देत आहे. व त्यासाठी निधी मंजूर करून आणत आहे कार्यकर्त्यांच्या भेटीदरम्यान गाव खेड्यातील प्रश्न जाणून घेत त्यावरील ठराव घेऊन थेट मुख्यमंत्र्यांच्या व पालकमंत्र्यांच्या  माध्यमातून कामे मंजूर करून घेत आहे अजून देखील तालुक्यातले महत्त्वाचे प्रश्न आहे  या संदर्भातील माहिती घेऊन तात्काळ कार्यक्षम असलेल्या मुख्यमंत्र्यांना कळवून प्रश्न मार्गी लावणार असल्याचे देखील अतुल पालवे व पांडुरंग शेळके पाटील यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमधून सांगितले. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तालुक्यातील महत्त्वाच्या प्रश्नांसाठी थेट शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करून प्रश्न सोडून घ्या असे आव्हान शिवसेनेच्या वतीने अतुल पालवे व पांडुरंग शेळके पाटील यांनी केले आहे. तालुक्याच्या कामांसाठी निधी मंजूर करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री दादा भुसे यांचे विशेष आभार या निमित्ताने त्यांनी मानले आहे.
थोडे नवीन जरा जुने