विद्या इंटरनॅशनल स्कुल च्या विद्यार्थ्यांचे चित्रकला स्पर्धेत यश
विद्या इंटरनॅशनल स्कुल च्या विद्यार्थ्यांचे चित्रकला स्पर्धेत यश

येवला : पुढारी वृत्तसेवा  

विद्या इंटरनैशनल स्कूल मध्ये विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी नेहमी  प्रयत्न केला जातो. रंगोत्सव सेलेब्रेशन्स, मुंबई या संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या अंतर राष्ट्रीय स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. या स्पर्धेत इ.१ली ते इ.१०वी पर्यंत च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. हि स्पर्धा मुंबई येथे घेण्यात आली होती.यास्पर्धेत इ.७वी ची कु.ह्रुदया लोढा,तर इ.९वी ची कु. सिद्धी वाघ या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे ३रा व ४था क्रमांक पटकावला.या विद्यार्थ्यांना ट्रॉफी, सर्टिफिकेट,मेडल देऊन गौरविण्यात आले तर कु. हितेशी पारख,प्रियकर फोफलिया, धनराज जैन, अद्वैत चव्हाण,समर्था कुमावत, प्रसिका केदारे,स्नेहा घराटे,मेघावी भंडारी,अनोखी चोपडा,हितांशी कासलीवाल, वैष्णवी परदेशी,काव्या दरेकर,फिरदोस पठाण,महेक पठाण,खूशी देसाई,शाश्वत शिंदे, आशिया शेख, पानसरे श्रृती लक्ष मुथा,मुथा रूचि, कार्या वडे,बोंबले राधिका ,किंजल समदडिया,साईराज भुरे, नैतिक संकलेचा,साई पाटिल,महेक पठाण,आर्या फड समरवीर परदेशी,सिया टोणपे, दुर्वा माठा या विद्यार्थ्यांना कार्टुन मेकिंग, शुद्धलेखन,रंगभरण,टैटू मेकिंग, ग्रिटिंग कार्ड मेकिंग, फोटो ग्राफी अशा विविध विषयांवर स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.
         या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाळेचे कलाशिक्षक संतोष बोंबले यांनी परिश्रम घेतले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शुभांगी शिंदे मैडम यांनी विद्यार्थ्यांनंचे अभिनंदन केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ राजेश पटेल व डॉ संगीता पटेल यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

थोडे नवीन जरा जुने