येवल्यात काँग्रेसपक्षा तर्फे खा. राहुल गांधी यांची खासदार की रद्द केल्याबद्दल निदर्शने

येवल्यात काँग्रेसपक्षा तर्फे खा. राहुल गांधी यांची खासदार की रद्द केल्याबद्दल निदर्शने 

येवला : पुढारी वृत्तसेवा
  येवला तालुका व शहर काँग्रेस कमिटी तर्फे काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधीं यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकसभेत झाला, अध्यक्षांच्या माध्यमातून सत्ताधारी भाजपाने हा निर्णय करून घेतला ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. सदर घटना लोकशाहीला घातक परिणाम करणारी आहे. सदर घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी तसेच केंद्र तथा मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी येवला तालुका व शहर काँग्रेस कमिटीतर्फे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्या समोर, विचुंर चौफुली, येवला येथे निदर्शने करण्यात आली.
      यावेळी नही चलेंगी नही चलेंगी हुकुमशाही नही चलेंगी ! राहुल गांधी आगे बढो, हम तुम्हारे साथ है! भाजप सरकारचा निषेध असो ! मोदी सरकार हाय हाय ! अशा विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला. 
       यावेळी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मांजरे, सुरेश गोंधळी, तालुकाध्यक्ष ॲड.समीर देशमुख, शहराध्यक्ष प्रीतम पटणी, शहर प्रवक्ते नानासाहेब शिंदे, डाॅकटर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. नीलम पटणी,  तालुका संघटक अण्णासाहेब पवार, राजे आबासाहेब शिंदे, मुकेश पाटोदकर, पर्यावरण विभाग तालुकाध्यक्ष दयानंद बेंडके, राजेंद्र गणोरे, ऋषिकेश गायकवाड,  नंदकुमार शिंदे, ॲड. अनिल झाल्टे, अशोक नागपुरे, संजय गोंधळी, राजवीर शिंदे, वसुधंरा शिंदे आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने