विद्यार्थ्यांना उद्योजक होण्याच्या दृष्टीने पोषक वातावरण किशोर अग्रवाल :

विद्यार्थ्यांना उद्योजक होण्याच्या दृष्टीने पोषक वातावरण
किशोर अग्रवाल : एस.एन.डी. फार्मसी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

येवला : पुढारी वृत्तसेवा

विद्यार्थ्यांना उद्योजक होण्याच्या दृष्टीने पोषक वातावरण आहे.युवकांना अनेक प्रकारचे व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत.त्यातच फार्मसी क्षेत्रात नव्या संधी उपलब्ध होत असून त्याकडे करियर म्हणून युवकांनी पहावे असे प्रतिपादन गुजरात येथील
सोना हेल्थकेअर व क्रेव्ही हरबलचे संचालक किशोर अग्रवाल यांनी केले.
बाभूळगाव येथील
एस.एन.डी.औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात विविध डेजसह वार्षीक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले.मेगा इव्हेन्टच्या निमित्ताने किशोर अग्रवाल व सौ.अग्रवाल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.तर मातोश्री शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी कुणाल दराडे अध्यक्षस्थानी होते.यावेळी नाट्यगृहाच्या मंचावर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुरेख सादरीकरण केले.
आजचा युवक करीयरच्या बाबतीत अग्रेसर आहे.अनेक युवकांनी व्यवसायातून नावलौकिक करत उत्तुंग भरारी घेतली आहे.त्यामुळे नोकरी महत्त्वाची आहेत पण व्यवसाय शक्य असून लोकांनी जिद्द मेहनतीच्या बाळावर यशाचे ध्येय बाळगावे असे यावेळी कुणाल दराडे यांनी सांगितले.
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ.आर.एस.कलकोटवार यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनानंतर उद्योजक कसे बनावे यावर मार्गदर्शन केले.शिक्षण घेताना सर्वांगीण विकासाला भर द्यावा असेही डॉ.कलकोटवार यांनी सांगितले.संस्थेचे संचालक रुपेश दराडे यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.यावेळी फार्मासिटिक्स विभाग प्रमुख प्रा.डॉ.प्रवीण सुरुसे यांनी आभार मानले तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.कविता शर्मा व सूत्रसंचालन डॉ. प्रेरणा जाधव यांनी केले.प्रा.अमोल गायके,प्रशांत पलघडमल,विजय रोकडे व डिप्लोमा विभाग प्रमुख वाल्मीक जगदाळे,राहुल भाबड,रामदास दराडे,प्रशासकीय अधिकारी समाधान झाल्टे,सुनील पवार व कार्यालयीन अधीक्षक सचिन कातकाडे आदी उपस्थित होते.
फोटो
येवला : एस.एन.डी. औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात संस्थेचे सेक्रेटरी कुणाल दराडे यांचे स्वागत करतांना प्राचार्य प्रा. डॉ.आर.एस.कलकोटवार.समवेत उद्योजक किशोर अग्रवाल आदी.
थोडे नवीन जरा जुने