येवल्यात शासन आपल्या दारी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

येवल्यात शासन आपल्या दारी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद


येवला : पुढारी वृत्तसेवा
 शासन आपल्या दारी अभियानाअंतर्गत येवला तालुक्यातील  शिबीर दिनांक 11 मे 2023 रोजी शहरातील महात्मा फुले नाट्यगृहात घेण्यात आले. सदर शिबिरास नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
यावेळी विविध विभागांच्या सुमारे 25 स्टॉल्सद्वारे नागरिकांना योजनांची माहिती देऊन त्यांचे अर्ज भरून घेण्यात आले.
सदर शिबिरास ऍड.माणिकराव शिंदे, बाळासाहेब लोखंडे, कुणाल दराडे, संजय बनकर,प्रमोद सस्कर,राजू परदेशी, सुनील पैठणकर, भाऊसाहेब धनवटे, अकलेश कासलीवाल, आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार आबा महाजन यांनी केले. त्यानंतर विविध विभागाच्या सुमारे 1600 लाभार्थ्यांना योजनांचे लाभ वितरित करण्यात आले. 
सदर कार्यक्रमासाठी तहसीलदार आबा महाजन, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, तालुका कृषी अधिकारी महेश जंगम, महावितरण ग्रामीणचे उपअभियंता मिलिंद जाधव यांचेसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप बोदरे आणि ज्ञानेश्वर चव्हाण  यांनी तर आभार प्रदर्शन मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी केले.
थोडे नवीन जरा जुने