सीबीएससीच्या दहावीच्या निकालात प्रज्वल येवले येवला तालुक्यात प्रथम

सीबीएससीच्या दहावीच्या निकालात प्रज्वल येवले येवला तालुक्यात प्रथम


येवला  :   पुढारी वृत्तसेवा

धानोरे येथील एस.एन.डी/ कंचनसुधा सी.बी.एस.सी. इंटरनँशनल स्कुलमधील प्रज्वल गोरख येवले हा येवला तालुक्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.
सी.बी.एस.सी.बोर्डाचा दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे.विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे.प्रज्वल येवले याने 94.50 टक्के मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.प्रसाद  राजुडे (86.83 टक्के),द्वितीय तर
यश मनोज धात्रक (82.67 टक्के)
याने तृतीय क्रमांक मिळवला. प्रज्वल याने सुरुवातीपासून अभ्यासात चुणूक दाखवत टॉपच्या दिशेने प्रवास सूरु केला होता. अपेक्षेप्रमाणे त्याने घवघवीत यश मिळवले असून तालुक्यात पहिला येण्याचा मान मिळविला आहे. प्रज्वल अतिशय हुषार विद्यार्थी असून दहावीच्या परीक्षेनंतर लगेचच कोटा येथे त्याने पुढील शैक्षणिक तयारीसाठी प्रवेश घेतला आहे.या ठिकाणी देखील तो झालेल्या पहिल्या चाचणीत टॉपर राहिलेला आहे.त्याच्या यशाबद्दल आमदार किशोर दराडे,संस्थेचे संचालक रुपेश दराडे,प्रशासकीय अधिकारी समाधान झालटे,सुनील पवार,प्राचार्य गोरख येवले तसेच संस्थेचे उपाध्यक्ष अक्षय जैन आदींनी अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांना प्राचार्य प्राची पटेल,पर्यवेक्षक सतिष निकम व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
● एसएनडीचा १०० टक्के निकाल
बाबळगाव येथील जगदंबा शिक्षण संस्थेच्या एसएनडी सीबीएसई स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला आहे.वैष्णवी क्षीरसागर हिने प्रथम क्रमांक मिळवला असून अनुजा मढवई ही द्वितीय तर कृष्णा गायकवाड तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.विद्यार्थ्यांना प्राचार्य प्राची पटेल,कृष्णा पवार,संगीता धारणकर,संतोष खोकले,कोमल गिरी,पूजा धुमाळ आदींचे मार्गदर्शन लाभले.
थोडे नवीन जरा जुने