कर्नाटक मधील विजयाचा येवल्यात काँग्रेस पक्षा तर्फे जल्लोष !कर्नाटक मधील विजयाचा येवल्यात काँग्रेस पक्षा तर्फे जल्लोष !

येवला : पुढारी वृत्तसेवा

     येवला तालुका व शहर कॉंग्रेस कमिटी तर्फे कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेल्या स्पष्ट बहुमताचा विंचूर चौफुली, येवला येथे विजयोत्सव साजरा करण्यात आला.
     यावेळी प्रथमतः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याला  निराधार व निराश्रित काँग्रेस विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश गोधंळी यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच फटाके वाजवून, पेढे वाटून व हालकडी चे गजरात विजयोत्सव साजरा करण्यात आला. कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला २२४ पैकी १३६ जागा सह स्पष्ट बहुमत मिळाले. कर्नाटक मधील विजय हा लोकशाहीचा विजय आहे, देशांमधील परिवर्तनाची ही नांदी आहे. अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. 
      यावेळी तालुकाध्‍यक्ष ॲड.समीर देशमुख, शहराध्यक्ष प्रीतम पटणी, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र लोणारी,  काँग्रेस जिल्हा सरचिटणीस प्रा.प्रकाश खळे, बळीराम शिंदे, डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष डॉ. निलम पटणी, तालुका सरचिटणीस दत्तात्रय चव्हाण, कार्याध्यक्ष सुकदेव मढवई, भाऊराव दाभाडे, तालुका संघटक अण्णासाहेब पवार, मुकेश पाटोदकर, राजेंद्र गणोरे, एन.एस. यु.आय. तालुकाध्यक्ष अक्षय शिंदे, झेड.डब्लु.ताडगे, अशोक नागपुरे, अशोक ठोंबरे, आबासाहेब शिंदे, रावजी पाबळे, संजय मढवई, संजय गोंधळी, अशोक साताळकर, आप्पा सावंत, कैलास भोरकडे 
गणेश निकम, साई मढवई, राजवीर शिंदे, पियुष थोरात, शिवेंद्रादित्य देशमुख आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने