येवल्यात 'शासन आपल्या दारी' शिबिराचे आयोजन पात्र लाभार्थ्यांना मिळणार विविध योजनांचे लाभ

येवल्यात 'शासन आपल्या दारी' शिबिराचे आयोजन


पात्र लाभार्थ्यांना मिळणार विविध योजनांचे लाभ


येवला  : पुढारी वृत्तसेवा


        राज्य शासनाच्या विविध विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या विविध योजना व सेवांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना एकाच छताखाली मिळावा, तसेच नागरिकांच्या वेळेचा अपव्यय टळावा यासाठी महसूल विभागाच्या पुढाकारातून विविध शासकीय कार्यालयांमार्फत गुरुवारी येवल्यात 'शासन आपल्या दारी' शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरादरम्यान येवला तालुक्यातील विविध विभागांकडील पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ दिले जाणार आहेत.

      कल्याणकारी राज्यव्यवस्थेच्या माध्यमातून नागरिकांसाठी समाजिक व आर्थिक सहाय्याच्या विविध योजना राबविण्यात येतात. शासकिय यंत्रणा सदर योजनांची प्रचार-प्रसिध्दी करून या योजनांची नियमितपणे अंमलबजावणी करीत असतात. मात्र यासाठी नागरिकांना शासकीय कार्यालयामध्ये येणे, योजनांची माहिती घेणे, योजनेसाठी आवश्यक असलेले दस्तऐवज विविध कार्यालयात जाऊन जमा करणे, जमा केलेले कागदपत्र पुन्हा सादर करण्यासाठी कार्यालयाकडे येणे अशा विविध प्रकियेतून जावे लागते. नागरिकांना दस्तऐवज उपलब्ध करून देणारी ही शासकीय कार्यालये वेगवेगळया ठिकाणी असल्याने योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना वेगवेगळया कार्यालयात जावे लागते, यात नागरिकांच्या वेळेचा अपव्यय होतो. काही वेळा अनेक लोकांना त्यांना शासनाकडून देय असलेल्या योजनांची माहिती नसते. त्यामुळे या योजनांचा लाभ गरजु व्यक्तीपर्यंत पोहचू शकत नाही. त्यामुळे शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांची अंमलबजावणी गतीमान करण्यासाठी शासनस्तरावरुन 'शासन आपल्या दारी' हे अभियान राबविण्यात येत आहे. 

     येवला तालुक्यात या योजने अंतर्गत पहिले शिबीर गुरुवार (दि.११) रोजी येवला शहरातील महात्मा फुले नाटयगृह या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. सदर शिबीरादरम्यान पात्र लाभार्थी नागरिकांना विविध विभागांकडील योजनांचे लाभ देण्यात येणार आहे. येवला शहरातील नागरिकांनी या ठिकाणी सकाळी १० वाजता उपस्थित राहून योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन
तहसीलदार आबा महाजन, गटविकास अधिकारी अन्सार शेख,मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर,तालुका कृषी अधिकारी जंगम व सर्व विभाग प्रमुख यांचे वतीने करण्यात  आले आहे.
थोडे नवीन जरा जुने