पुरग्रस्तांना शासकीय मदतीचे धनादेश वाटप खाजगी कार्यालयातून : भाजपने केली तक्रार



पुरग्रस्तांना शासकीय मदतीचे धनादेश वाटप खाजगी कार्यालयातून : भाजपने केली तक्रार 
 
येवला :  पुढारी वृत्तसेवा
येवला शहरातील गेल्या वर्षी अचानक आलेल्या  पुरामध्ये नुकसान झालेल्या पुरग्रस्तांना शासकीय मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले.या धनादेशाचे वाटप करतांना शासकीय नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याची तक्रार भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने थेट प्रांताधिकारी यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.प्रांताधिकारी यांचे प्रतिनिधी हिरा शंकर हिरे यांनी स्वीकारले.

पुरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना सहाय्यता म्हणून वाटप करण्यात आलेले धनादेश शासकीय नियमांचे उल्लंघन करीत थेट  आमदार कार्यालयातून ( निवासस्थातुन) वितरीत करण्यात आले याची  सखोल चौकशी करून उचीत कारवाई करण्याची मागणी केल्याने राजकीय वातावरणात उष्मा निर्माण झाला आहे.निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्रीना ना..एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री ना..देवेंद्र  फडणवीस,केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री.ना.डॉ.सौ.भारतीताई प्रविण पवार, पालकमंत्री ना.दादा भुसे,जिल्हाधिकारी  नाशिक यांना पाठविण्यात आल्या  आहेत.
निवेदनावर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिंदे,ओबीसी जिल्हा सरचिटणीस राजूसिंग परदेशी,भाजप तालुकाध्यक्ष डॉ नंदकिशोर शिंदे,तालुका संघटन सरचिटणीस नानासाहेब लहरे,युवा नेते युवराज पाटोळे,गणेश गायकवाड,संतोष काटे,सुनील सोमासे,महेशकुमार पाटील,लक्ष्मण सुरासे,कृष्ण कवर,दत्ता सानप, 

येवला शहरात सन २०२२ मधील  पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे पुराचे पाणी शहरात घुसून नागरिकांचे अतोनात नुकसान झाले होते. या संदर्भानुसार नुकसानीचे शासकीय पंचनामे व चौकशी होऊन शासनाने मदत जाहीर केली. या मदतीचे धनादेश सर्व शासकीय नियमांचे उल्लंघन करीत येवला मतदार संघाचे  विधानसभा आमदार छगन भुजबळ यांचे निवासस्थान कम कार्यालयातून खाजगीरीत्या लाभ पोहचवण्याचा हेतूने बेकायदेशीररित्या वाटप करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.
 लोकप्रतिनिधींच्या खाजगी कार्यालयात ( निवासस्थानी ) तहसिलदार यांनी शासकीय अधिकाराचा गैरवापर करीत मदतीच्या धनादेशाचे वाटप शासकीय कार्यालयाच्या बाहेर केले. यात तहसिलदार यांची ही भुमिका सरकार विरोधात व संशयास्पद असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.पुढे निवेदनात म्हटले आहे की,लोकप्रतीनिधींच्या संगनमताने, दबावाने असे कृत्य करणे नियमबाह्य व बेकायदेशीर आहे. या बाबत सखोल चौकशी करण्यात येऊन संबंधित दोषींवर उचित कडक स्वरूपाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपने  केली आहे.
==========================================================================
गेल्या पावसाळ्यात पुरामुळे  झालेल्या नुकसानीत पूरग्रस्तांना सहाय्यता मिळावी म्हणून येवला शहर व तालुका भाजपने सतत पाठपुरावा केला आहे.शिंदे-फडणवीस सरकारने या लोकांना मदत देवून त्यांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला आहे.सहाय्यता देणेबाबत श्रेयवादाचा विषय महत्वाचा नसून हि मदत शासनाने पूरग्रस्तांना दिली आहे.त्या धनादेशाचे वाटप नियमानुसार शासकीय कार्यालयातच होणे नियमाला धरून आहे.येथे दबावामुळे शासकीय नियमांना हरताळ फासून खाजगी निवासस्थानातून अशा प्रकारचे सरकारी अधिकारी शासकीय मदतीच्या  धनादेशाचे वाटप करणे गैर आहे.याची चौकशी अपेक्षित आहे.असे प्रकार करायचे असतील तर शासकीय कार्यालयांना कुलूपं लावावीत.
आनंद शिंदे 
भाजप जिल्हा उपाध्यक्ष 
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
==============================================================================

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने