राष्ट्रीय कुराश कुस्ती स्पर्धा येवल्याचे लोणारी व लोंढे यांना कांस्य पदकराष्ट्रीय कुराश कुस्ती स्पर्धा


येवल्याचे लोणारी व लोंढे यांना कांस्य पदक


येवला  : पुढारी वृत्तसेवा


       भंडारा येथे झालेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय कुराश कुस्ती स्पर्धेत मोठे यश संपादन केलेल्या येवला येथील मल्लांनी पुढे छत्तीसगड येथे झालेल्या राष्ट्रीय कुराश कुस्ती स्पर्धेत देखील चमकदार कामगिरी केली. छत्तीसगड येथे झालेल्या या राष्ट्रीय कुराश कुस्ती स्पर्धेत येवला येथील रोहन राजेंद्र लोणारी व वैभव लोंढे या दोन युवा मल्लांनी आपापल्या वजन गटात कांस्यपदक पटकावले.

      महाराष्ट्रातील भंडारा येथे झालेल्या राज्यस्तरीय कुराश कुस्ती स्पर्धेनंतर छत्तीसगड येथे पुढील राष्ट्रीय कुराश कुस्ती स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत येवला येथील कै. धोंडीराम वस्ताद तालीम संघाच्या येथीलच कै. भाऊलाल पैलवान लोणारी राष्ट्रीय कुस्ती संकुलात सराव करणाऱ्या युवा मल्लांनी आपल्या नेत्रदीपक कुस्त्यांचे प्रदर्शन घडवले. छत्तीसगड येथे झालेल्या १२ व्या सीनियर नॅशनल कुराश कुस्ती स्पर्धेमध्ये रोहन राजेंद्र लोणारी याने प्लस १०० किलो वजन गटात, तर वैभव लोंढे याने प्लस ९० किलो वजन गटात कांस्यपदक पटकावले. राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत यश संपादन केलेल्या मल्लांचे येवल्यासह जिल्ह्यातून कौतुक केले जात आहे.
----
(सोबत फोटो)
थोडे नवीन जरा जुने