एन्झोकेम विद्यालयात राजर्षी शाहू जयंती

एन्झोकेम विद्यालयात राजर्षी शाहू जयंती


 येवला  : पुढारी वृत्तसेवा

    येथील सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन्झोकेम विद्यालयात राजर्षी शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यात आले. विद्यालयाचे प्राचार्य दत्तकुमार उटवाळे, उपप्राचार्य सुरेश जोरी, पर्यवेक्षक अनिल शेलार, कैलास पाटील, विजय साळुंके, कैलास चौधरी, बापू कुलकर्णी यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
     मनोगत व्यक्त करताना प्राचार्य दत्तकुमार उटवाळे यांनी  जनतेचा राजा असलेल्या शाहू महाराजांचे महान समाजकार्य सांगतानाच शाहू महाराजांनीच भारतात प्रथम आरक्षण सुरू केल्याचं सांगितले. गरिबांना व दीनदलितांना शिक्षण घेता यावे यासाठी महाराजांनी वेगवेगळ्या शिष्यवृत्ती सुरू केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेरणा जोशी यांनी केले तर आभार शीतल शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने