राजर्षी छत्रपती शाहू महाराज एक आदर्श क्रांतिकारक लोकनेता

राजर्षी छत्रपती शाहू महाराज एक आदर्श क्रांतिकारक लोकनेता 

  
येवला : पुढारी वृत्तसेवा

राजर्षी छत्रपती शाहू महाराज एक आदर्श आणि क्रांतिकारक लोकनेता होते. त्यांनी आपल्या २८ वर्षाच्या कार्यकाळात अनेक धाडसी आणि क्रांतिकारक निर्णय घेतले. बहुजन समाजाला शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, हे ते फक्त सांगत बसले नाही, तर प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे केले, असे प्रतिपादन पत्रकार सुनील गायकवाड यांनी केले.
स्वामी विवेकानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, एरंडगाव येथे आयोजित छत्रपती शाहू महाराज जयंतीसोहळा व अमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्ष स्थानावरून गायकवाड बोलत होते.

जनतेशी थेट संवाद साधणारे एक आदर्श व्यक्तीमत्व म्हणजेच छत्रपती शाहू महाराज होय. शिक्षणासह वसतिगृह संकल्पना त्यांनी साकार केली. कर्मवीर भाऊराव पाटील यांना घडवण्यातही शाहू महाराजांचा मोठा वाटा असल्याचे गायकवाड म्हणाले.
शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरूवात झाली. यावेळी पर्यवेक्षिका राधिका बावके यांनीही मनोगत व्यक्त केले.
  उत्सव प्रमुख माधुरी सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. तर आभार शिल्पा सूर्यवंशी यांनी मानले.
यावेळी दिनेश धात्रक, संजय वाबळे, विलास गोसावी, संजय मढवई,  शिक्षक उपस्थित होते.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष पत्रकार सुनील गायकवाड यांचा सत्कार करताना पर्यवेक्षक राधिका बावके, दिनेश धात्रक, संजय वाबळे आदी.
थोडे नवीन जरा जुने