डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे देश एकसंघ - मंत्री छगन भुजबळ




डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे देश एकसंघ - मंत्री छगन भुजबळ


येवला : पुढारी वृत्तसेवा

आर्थिक परिस्थिती नसल्याने अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊ शकत नाही. देशात आणि राज्यात त्यांची संख्या अधिक आहे. या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत असून राज्यातील विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी महाराष्ट्र शासन कटिबध्द आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.


देशाचे उपराष्ट्रपती जगडीप धनखड यांच्या हस्ते आज संपूर्ण राज्यात ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. येवला येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील संविधान मंदिराचे उद्घाटन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.


यावेळी प्रांतअधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, जलचिंतन सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.मोहन शेलार, मलिक शेख, प्राचार्य वाय.के.कुलकर्णी, स्थानिक प्राचार्य आर.एस.राजपूत, गटनिधेशक आर.के.आहेर, डी.एल.मगर यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.


यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षणाचा कुठलाही अधिकार नसतांना मुलींना शिक्षण देण्याचे कार्य महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलं. यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची निर्मिती करून देशातील सर्व नागरिकांना सर्वांना समान अधिकार प्राप्त झाले. सर्वाँना समान पातळीवर अधिकार देण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.


ते पुढे म्हणाले की, भारतीय संविधान हे अतिशय मजबूत पायावर उभ आहे. आपल्या देशातील लोकशाही व्यवस्था टिकविण्यास सर्वांना एकसंघ बांधून ठेवण्याचे काम संविधानाने केलं आहे. भारताच्या संविधानाचा अभ्यास करून अनेक देशांनी आपल्या संविधानाची निर्मिती केली आहे. आपलं संविधान अतिशय बळकट असून संविधान बदलणे हे अशक्य आहे. या संविधानाचा अपमान होणार नाही. त्यातील कायद्यांचे आणि नियमांचे उल्लंघन होणार नाही याची विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने