धडपड मंचच्या वतीने विद्यार्थीनीना सायकल वाटप
येवला : पुढारी वृत्तसेवा
अलीकडे शिक्षणाचे महत्व वाढत असून ग्रामीण भागातील मुली देखील शिक्षणासाठी शहरात येत आहे. अशाच दोन गरजू मुलींना शहरातील सेवाभावी संस्था धडपड मंच च्या वतीने सायकलचे वाटप करण्यात आले.
अध्यक्षस्थानी येवल्यातील सनदी लेखापाल अजय सोमाणी व डॉ. सागर बोळे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा नारायण शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुलींचे शिक्षणात प्रमाण वाढावे, स्वगावावरून बाहेर गावच्या शाळांमध्ये ये-जा करणाऱ्या विद्यार्थिनींच्या अध्ययन प्रक्रियेत खंड पडू नये, यासाठी एक छोटासा प्रयत्न म्हणून हा उपक्रम केल्याचे धडपड मंचचे अध्यक्ष प्रभाकर झळके यांनी यावेळी सांगितले. सायकल मिळाल्याबद्दल रसिका पांगुळ, रा. अंगणगाव व सीमा सोनवणे, रा.आडगाव या विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसून आले. मुलींच्या पालकांनी धडपड मंच चे आभार व्यक्त केले.
याप्रसंगी किशोर कुमावत, दत्तात्रय नागडेकर, दीपक कासले, शामसुंदर काबरा, मंगेश पैठणकर, मुकेश लचके, मयूर पारवे, गोपाल गुरगुडे, गोपी दाणी, आबा सुकासे, कुणाल ठोंबरे, गोलू नागपुरे, गणेश चव्हाण आदी उपस्थित होते.