हुतात्मा स्मारक येथे क्रांती दिनानिमित्त अभिवादन
येवला –
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी क्रांती दिनानिमित्त हुतात्मा स्मारक येथे आज (दि. ९ ऑगस्ट) अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. तहसीलदार आबा महाजन व मुख्याधिकारी तुषार आहेर यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी नगरपरिषदेचे अधिकारी,उपमुख्याधिकारी चंद्रकांत भोये आस्थापना प्रमुख बाळासाहेब पारधी लेखाधिकारी किरण अहिरे राधेश्याम निकम शशिकांत मोरे राजेंद्र गंगापूरकर राजेंद्र निकम उदय परदेशी सुरेश गुंडाळे संजय गोसावी राजेंद्र लोंढे प्रवीण नागपुरे राजेंद्र जांभुळकर अशोक कसारे सोमनाथ भुरुख मयूर गोसावी गणेश गाडेकर राकेश गवते नितीन आहेर सुषमा विखे सरस्वती तुंबारे उज्वला अहिरे खैरुणीसा शेख राजेश निकम राहुल जाधव प्रभाकर वाघ नितीन काळनं मच्छिंद्र पवार चेतन लोंढे वैभव जोर्वेकर नितीन हारके लखन वखारे कर्मचारी, स्वातंत्र्यसैनिकांचे वारस, तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीत व घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
मुख्याधिकारी तुषार आहेर यांनी यावेळी आपल्या मनोगतात सांगितले की, “आपल्या स्वातंत्र्याचा पाया हुतात्म्यांच्या बलिदानावर उभा आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणे ही आपली जबाबदारी आहे.” यावेळी हर घर तिरंगा अभियानांतर्गत तिरंगा ची शपथ घेण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरपरिषदेचे प्रकल्प अधिकारी संदीप बोढरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन गौरव चुंबळे शहर समन्वयक यांनी केले
हर घर तिरंगा अभियानांतर्गत दिनांक 11 ऑगस्ट 2025 सकाळी ठीक दहा वाजता मोटरसायकल रॅलीच्या व आयोजन करण्यात आले असून तरी सर्व देश प्रेमींनी या रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले.
श्री तुषार आहेर (मुख्याधिकारी येवला नगरपरिषद येवला)