पारेगाव जि.प शाळेत एकही शिक्षक नसल्याने शाळा कुलुपबंद

येवले शहरापासून अवघ्या २ किमीवर असलेल्या जि.प प्राथमिक शाळेत एकही शिक्षक नसल्याने संतप्त गांवकरी एकत्र आले व त्यांनी सदरहू शाळेला कुलुप लावले. या शाळेत सध्या  फक्त एकच शिक्षीका असून ती रजेवर गेल्यावर दुसरे शिक्षक आलेच नसल्याने सदर प्रकार घडला. नंतर पंचायत समितीच्या पदाधिकारी जागे झाले व त्यांनी दुपारच्या सत्रात शिक्षकांची पुर्तता करुन सदरचे कुलुप उघडले. या प्रकारने सर्वत्र नाराजी असुन पुर्ण शिक्षक प्रत्येक शाळेत नेमावेत अशी मागणी पारेगावकर करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने