स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरीक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

 स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरीक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न 

येवला -  प्रतिनिधी

येथील श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरीक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, ता. २रोजी येवला मर्चंन्टस्  बँकेच्या डॉ. हेडगेवार सभागृह येथे संघाचे अध्यक्ष रामेश्‍वर कलंत्री यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
प्रारंभी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन सभेस सुरुवात झाली.  गतवर्षातील दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.  गोविंदराव खराडे यांनी प्रास्ताविक सादर केले.  राजेंद्र आहेर यांनी सन २०१७-१८ या आर्थिक वर्षातील अंदाजपत्रक वाचुन दाखविले तर विजय पोंदे यांनी इतिवृत्त सादर केले.  नविन सभासदांचा संघाचे अध्यक्ष रामेश्‍वर कलंत्री व उपाध्यक्ष दिगंबर कुलकर्णी यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.  संघाच्या सदस्यांसाठी विरंगुळा केंद्र उभारणी साठी खासदार निधीतुन दहा लक्ष रुपये प्राप्त झाले असुन लवकरच कामास सुरुवात होऊन सुंदर असे विरंगुळा केंद्र सर्वांसाठी उभे राहणार असल्याचे आपल्या अध्यक्षीय भाषणात कलंत्री यांनी सांगीतले. 
याप्रसंगी तुकाराम पवार, शामसुंदर काबरा, प्रभाकर झळके, सुधिर गुजराथी, बाळकृष्ण पाटोदकर, दिनकर कंदलकर,  अशोक जाधव, राजेश पटेल, शैलेश गुजराथी, शेख मुजावर, अश्पाक अली, वसंत वाईकर, वाणी गुरुजी, आदींसह संघाचे सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने